दिशा लाईव्ह न्यूज -:- नेरी ता जामनेर येथील नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी जिजाऊ महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन नानासो प्रमोद अमृतराव पाटील हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सेक्रेटरी तसेच जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्ष ताईसाहेब वर्षाताई प्रमोद पाटील, जिजाऊ महिला मंडळाच्या सचिव सुगंधा पाटील,जळगाव जिल्हा जिजाऊ महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा लीना राम पवार, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे,जिजाऊ महिला ब्रिगेड जळगाव शहराध्यक्ष डॉ जयश्री देवरे (भोसले), संगीता ताई पाटील, नेरी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच इंदुताई नाना पाटील, रोटवद गावच्या पोलीस पाटील भारतीताई पाटील, सुनिताताई पाटील, जळगाव जिल्हा उद्योजक कक्षा अध्यक्ष आबासाहेब पाटील, संचालक अशोक नारायण कोळी, संचालक मंडळातील सर्व सदस्य, सुनंदा कदम, जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर ए पाटील, पर्यवेक्षक एस एन पाटील, दादासो अमृतराव चिंधूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवदचे मुख्याध्यापक डी ए पाटील, विज्ञान विभाग प्रमुख नेहा पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.
जिजाऊ महिला मेळाव्याच्या निमित्त आयोजित विविध स्पर्धा तसेच उपक्रमांसाठी परीक्षक म्हणून विजय जोशी सर(जामनेर), माधुरी चौधरी(रत्नागिरी), ज्योती सुरेंद्र पाटील(जळगाव), जयश्री धीरेंद्र पाटील(जळगाव) , डॉ निवेदिता पाटील(जामनेर), स्मिता सिसोदे(जळगांव), सीमा पाटील(नेरी), सोनाक्षी ललवानी(जामनेर) यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दादासो अमृतराव चींधुजी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिला मेळाव्यानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, भारतीय सण उत्सव देखावा, भातुकली खेळ मांडणी, किल्ले बनवणे, चित्रकला व हस्तकला, बुके तयार करणे, हस्ताक्षर स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, खाद्यपदार्थ स्टॉल मांडणे यासारख्या स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू व वाणवाटप, टोकन बक्षिसे, सरप्राईज बक्षिसे, चालता बोलता प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची, म्युझिक रिंग, एक मिनिट खेळ, मैदा फुंकणे यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे बंपर प्राईज सौ.ललिता रामदास वाघोडे यांनी मिळवले. स्पर्धा व उपक्रमातील विजयी स्पर्धकांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
जिजाऊ महिला मेळाव्याचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, दादासो अमृतराव चींधूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवद, मोनालिसा इंग्लिश मीडियम स्कूल, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिर या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी आर वाघ यांनी केले.
Post a Comment
0 Comments