दिशा लाईव्ह न्यूज -:- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्गदर्शनानुसार व पंचायत समिती जामनेर गटशिक्षणाधिकारी श्री राम लोहार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 'ग्यानप्रकाश फाउंडेशन पुणे' यांच्या सहकार्याने नेरी दिगर केंद्रात कार्यशाळा संपन्न झाली.
प्रत्येक गाव स्तरावर शैक्षणिक ग्रामसभेचे नियोजन करायच्या हेतूने नेरी दिगर केंद्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील सन्माननीय सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, अध्यक्ष व एक सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व सर्व मुख्याध्यापकांची कार्यशाळा दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी जि .प .शाळा करमाड येथे उत्साहात पार पडली.
सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी करमाड गावचे सुपुत्र व बन्स अँड मॅकडोनाल्ड कंपनी मुंबई येथे सेक्शन मॅनेजर पदावर नोकरीस असलेले श्री मनोज दादा मराठे हे होते.तर कार्यक्रमाला नेरी दिगर केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. शुभांगी ताई पाटील उपस्थित होत्या.
सदर कार्यशाळेसाठी नेरी दिगर केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावातील सन्माननीय सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामसेवक, अंगणवाडीच्या सेविका व सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रास्ताविकात केंद्रप्रमुख शुभांगी ताई पाटील यांनी शाळेला "'गावाचा आधार असावा.. व गावाला शाळेचा अभिमान असावा".. या उक्तीप्रमाणे शाळेचा विकास हा पालक, समाज व ग्रामपंचायत यांच्या सहकार्यानेच होऊ शकतो आणि शाळा गुणवत्तेकडे वाटचाल करू शकते हे उपस्थितांना पटवून दिले.
यानंतर करमाड शाळेचा स्वच्छ सुंदर व आदर्श शाळेकडे जाण्याचा प्रवास प्रोजेक्टर द्वारे उपस्थितांना दाखवण्यात आला. व शाळेत केलेली कामे उपस्थित आणि प्रत्यक्ष अनुभवली.. याच वेळेस सर्वांना सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे गाव असलेले उपळाई बुद्रुक या गावाची ओळख करून देण्यात आली व लोकसहभागाचे महत्त्व पटवून दिले.. ग्यानप्रकाश फाउंडेशनचे समन्वयक श्री. सागर धनेधर सर यांनी लोकसभागातून शाळेचा विकास साधून गुणवत्तेकडे वाटचाल करता येते. लोकसहभाग, आदर्श शाळा व गुणवत्ता यांचा संबंध उपस्थितांना पटवून दिला.
उपस्थित सरपंच व मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून ग्रामपंचायत व गावाच्या सहकार्याने आपल्या शाळा आणखीनच आदर्श बनवण्याचा निश्चय केला. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री मनोज दादा मराठे यांनी माझे गाव माझी शाळा प्रत्येक नागरिकाने आपल्या गावाबद्दल, शाळेबद्दल आत्मीयता दाखवावी. समाजासाठी आपले काही देणं लागते. या उद्देशाने प्रत्येकाने शाळेच्या विकासात आपल्या परीने मदत करावी व आपल्या गावाची शाळा आदर्श करून गुणवत्तेकडे वाटचाल करावी व यशस्वी नागरिक घडवावेत अशा सर्वांना सदिच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सौ शुभांगी ताई पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करमाड गावचे सन्माननीय सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष सर्व सदस्य, करमाड शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments