दिशा लाईव्ह न्यूज -:- शेंदूर्णी, ता.जामनेर येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या शेंदुर्णी सह. खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसायटी लि. शेंदुर्णीच्या काल झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन व भाजपचे जेष्ठ नेते संजय गरुड यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनलचा एकतर्फी मोठ्या फरकाने विजय झाला आहे.
सहकार विकास पॅनलचे नेतृत्व मंत्री ना. गिरीश महाजन व संजयदादा गरुड यांनी केले.
तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व डी. के. पाटील व दिलीप खोडपे यांनी केले होते.
जामनेर व सोयगाव, पाचोरा तालुक्यातील ७१ गावात संस्थेचे २४६६ तसेच सहकारी संस्थेचे ४३ सभासद असुन आज झालेल्या निवडणुकीत एकुण २५०९ मतदानापैकी १९७० सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. सहकार विकास पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते १) सुकलाल मोतीराम बारी २) योगेश भागवत बनकर ३) ईश्वर कडु पाटील ४) अरुण मोतीराम घोलप ५) गोपाळ विश्वनाथ गरुड ६) राजेंद्र लक्ष्मण पवार ७) दगडु विष्णु पाटील ८) कैलास एकनाथ पाटील ९) प्रफुल्ल विक्रम पाटील १०) युवराज नारायण पाटील ११) सर्वसाधारण संस्था गटातुन भागवत बाबुराव पाटील १२)
विमुक्त जाती भटक्या जमाती / विशेष मागास मतदारसंघ शामराव नामदेव सावळे. १३) इतर मागास प्रवर्ग सिताराम श्रीपत पाटील १४) अनुसूचित जाती जमाती प्रल्हाद खंडु वानखेडे महिला राखीव १५) छाया श्रीकृष्ण पाटील १६) वंदना संजय पाटील हे उमेदवार विजयी झाले आहे.
१९/०९/१९४६ या वर्षी या संस्थेची स्थापना झाली असुन दगडु विष्णु पाटील वय ८३ हे जेष्ठ संचालक असुन ५० वर्ष झाले ते सलग या संस्थेचे संचालक आहेत.
या वेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सहा. निबंधक जळगांव चे डी. व्ही. पाटील तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जामनेर चे सहकार अधिकारी एस. एस. पवार यांनी काम बघीतले. यावेळी पहुर पोलिस स्टेशनचेपोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुर्णी दुर क्षेत्रचे पोउनि. नंदकुमार शिंब्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
या निवडणुकीत संस्थेचे सभासद, गावागावांतील नेते कार्यकर्ते पदाधिकारी उमेदवार यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा विजय झाला असुन ना. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था यापुढे सुद्धा सभासद शेतकऱ्यांसाठी मदत करतच राहणार असल्याची प्रतिक्रिया सहकार विकास पॅनलचे नेते भाजपचे जेष्ठ नेते संजय गरुड यांनी दिली आहे.
Post a Comment
0 Comments