दिशा लाईव्ह न्यूज --::----शेंदुर्णी मध्ये शिव शंभू प्रतिष्ठान तर्फे जिवंत देखाव्या सह छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने मिरवणुकीसह शिवजयंती साजरी करण्यात आली.सालाबादप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येते.यामध्ये गावातील सर्व विद्यालयांतील विद्यार्थी विद्यार्थिनी जिवंत देखाव्यासह सहभागी झाले होते.
सकाळी आठ वाजता गरुड शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांच्या निवासस्थानापासून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे चेअरमन संजय गरुड व सौ सरोजिनीताई गरुड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर आचार्य गरुड विद्यालयातील एन.सी.सी.कॅडेटस् कडून एन.सी.सी ऑफिसर युवराज पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना सलामी देत मानवंदना दिली.त्यानंतर छत्रपती शिवरायांची मूर्ती पालखीमध्ये बसवून त्यामागे छत्रपती शिवरायांच्या आणि माॅसाहेब जिजाऊंच्या वेशातील विद्यार्थी विद्यार्थिनी अश्वारूढ झाले होते. तद्नंतर छत्रपती शिवरायांच्या काळातील अष्टप्रधान मंडळाची वेशभूषा साकारण्यात आली होती. सलवार कुर्ता असलेला नेहरू ड्रेस परिधान केलेले मावळे व नऊवार पातळ परिधान केलेल्या मुली असा रॅलीतील पेहराव करत गावातील मुख्य रस्त्यावरून ढोल ताशांच्या आणि लेझीम पथकाच्या गजराने मिरवणुकीस सुरुवात झाली.
यामध्ये गावातील गरुड प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा, सरस्वती विद्यालय,ललवाणी हायस्कूल,सूर्योदय किड्स स्कूलचे विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
यावेळी नगरपंचायत चे मुख्याधिकारी विवेक धांडे,शरद कोल्हे, सागरमल जैन,शांताराम गुजर,माजी प.स.सदस्य सुधाकर बारी, शेंदुर्णी आउट पोस्टचे पोलीस निरीक्षक सिंब्रे साहेब,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष स्नेहदीप गरुड,सौ प्रियानंदा गरुड, शिवराज गरुड,सौ.रक्षदा गरुड,श्रीमती के डी पाटील मॅम,श्रीमती एम आर चव्हाण मॅम,श्रीमती देशमुख मॅम,श्रीमती पी एस पाटील मॅम,विठ्ठल मामा फासे,विठ्ठल गरुड,महेश भदाणे, दिग्विजय सूर्यवंशी,गरुड विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस चौधरी,गरुड महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य संजय भोळे,गरुड प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौदामिनी गरुड,स्वर्ग शेठ ललवाणी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक नाईक सर,आदी मान्यवर पूजनावेळी उपस्थित होते.
त्यानंतर गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जात गांधी चौक येथे सांगता झाली सांगता प्रसंगी विहान गुजर, युगांत निकम,चेतना मोहने,
दिव्या पाटील,जागृती गुजर,कोमल मस्के, कल्याणी शिंपी,पुनम शिंदे,
रागिनी पाटील या शाळेतील विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवरायांवरील भाषण घेण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.डी.एस.वारंगणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक प्राध्यापिका आणि शिवशंभु प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments