Type Here to Get Search Results !

पहूर येथे संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी



दिशा लाईव्ह न्यूज-:-  पहूर , ता . जामनेर ( ता . १६ )सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत  महान शिवभक्त संत शिरोमणी  नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी पहूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली .

    पहूर पेठ येथे  बाळू भामेरे यांच्या निवासस्थानी  सुवर्णकार  समाजाचे अध्यक्ष गिरीश भामेरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .प्रारंभी त्यांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .


 याप्रसंगी माजी अध्यक्ष  संजय  बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती . त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले .सचिन बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले .

प्रारंभी वर्षभरात दिवंगत झालेल्या समाज बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

    भरत भामेरे , सुभाष इखनकर ,  रामकृष्ण  जगताप , निळकंठ महाराज ,  प्रदीप भामेरे ,अशोक भामेरे , नितीन इखनखर यावेळी सुवर्णकार समाज बांधव , भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . यावेळी खालील विषयावर चर्चा करण्यात आली .

समाज मंदिराचे बांधकाम , मंडळाचे नोंदणी करणे , 

 तरुणांसाठी मंडळ तयार करणे ,  महिलांसाठी मंच तयार करणे , 

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात करणे , बाल कवयित्री ज्ञानेश्वरी भामेरे सुवर्णकन्या पुरस्कार दरवर्षी समाजातील एका गुणवंत विद्यार्थिनीला देण्याचे जाहीर करण्यात आले .

 याप्रसंगी समाजाची सचिव शंकर भामेरे यांनी संत नरहरी महाराज यांच्या जीवनातील हरिहर ऐक्याच्या साक्षात्काराची कहाणी सांगितली . सूत्रसंचालन करून त्यांनी आभार मानले .

Post a Comment

0 Comments