दिशा लाईव्ह न्यूज , मुकेश चौधरी,(यशवंत नगर भडगांव ) : -: टोणगांव जि. प. मराठी शाळेत निपुण भारत अंतर्गत माता पालक मेळावा स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या मा. नगरसेविका योजना पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
सदर प्रंसगी माता भगिनी पालकांना हळदी कुंकू समारंभात सौभाग्य वाण, भेट वस्तू प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच माता भगिनी, शिक्षिका यांच्यात संगीत खुर्ची, उखाणे, गीत गायन, व्हिडिओ कॉन्फरन्स आदी उपक्रमशील कार्यक्रम घेण्यात येऊन बक्षीस वितरण करण्यात आले.
विद्यार्थी सुरक्षा, स्वच्छ्ता अभियान व विद्यार्थी सर्वांगीण विकास बाबत कार्यक्रमाच्या अध्यक्षा योजना पाटील व प्रमुख पाहुणे सोनाली बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका मिरा साळुंखे, उपशिक्षिका ज्योती साळुंखे, सुषमा पाटील, उज्वला पवार, सुवर्णलता पाटील, प्रकाश पाटील, श्रुती पाटील यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post a Comment
0 Comments