Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकाऱ्यांनी भरविली शिक्षकांची शाळा शिक्षक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सुमारे ४२५ शिक्षकांचा सहभाग जिल्हास्तरीय गुणवत्ता विकास कार्यशाळा


दिशा लाईव्ह न्यूज, शंकर भामेरे-ता . जामनेर ( ता . ६  )

शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू असून शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने विद्यार्थी घडविण्यासाठी झोकून  द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी केले . 

   जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव आणि  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग , जिल्हा परिषद यांच्या जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जी .एच . रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय गुणवत्ता विकास कार्यशाळेत ते बोलत होते .


 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ . अनिल झोपे यांनी प्रस्ताविकेतून जिल्ह्याच्या गुणवत्तेची सद्यस्थिती मांडली . प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले .

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .अंकित यांनी दहा दिवस गणितासाठी उपक्रमाची उपयुक्तता विशद केली .

याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ . कल्पना चव्हाण , रायसोनी ग्रुपच्या प्रीती अग्रवाल , अधिव्याख्याता डॉ . जगन्नाथ दरंदले मंचावर उपस्थित होते . सूत्रसंचालन वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा . डॉ . चंद्रकांत साळुंखे यांनी केले .




याप्रसंगी जिल्हाधिकार्‍यांनी शिक्षकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मौलिक मार्गदर्शन केले .

               १४ रत्नांचा गौरव!!

 शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी 'विनोबा ॲप ' चा प्रभावी वापर करणाऱ्या १४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले .  


        जिल्हाधिकारी उवाच . . .


विद्यार्थ्याला आईप्रमाणे स्वीकारा .


शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू  .


अडचणींवर मात करा .


गुणवत्ता वाढविण्यासाठी  प्रामाणिक प्रयत्न करा .

                       भाषा विकासासाठी

 अक्षर , शब्द , वाक्य , चर्चा आणि संभाषण या पंचपदीचा वापर करा .

 गणित शिक्षणासाठी* संख्याज्ञान ,मूलभूत  क्रिया ,  सिद्धांत , निर्णय , अंतिम उत्तर या पंचसूत्रीचा उपयोग करा .


                 वर्गात शिकविताना ...

मानसशास्त्र , विद्यार्थ्यांची आवड ,  पुनरावृत्ती , कुटुंबासोबत समन्वय , सोपे करून सांगणे  या मूलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करावे .


याप्रसंगी तज्ज्ञ मार्गदर्शक , प्रशिक्षणार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .



Post a Comment

0 Comments