Type Here to Get Search Results !

पहूर कसबे स्मशानभूमीतील सांत्वन शेडचे काम पूर्णत्वास विक्रम घोंगडे यांच्या भीक मांगो आंदोलनाचे यश - आंदोलनातून जमा निधीतून बैठक बाकाचे लोकार्पण



दिशा लाईव्ह न्युज , पहुर , ता . जामनेर ( सौ गीता भामेरे ) जामनेर तालुक्यातील पहुर कसबे गावातील वैकुंठ धाम स्मशानभूमीत सांत्वन शेडचे रखडलेले काम पूर्णत्वास आले असून ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे व सहकाऱ्यांच्या भिकमांगो आंदोलनाचे हे यश असल्याचे बोलले जात आहे .


सदर सांत्वन शेडचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडल्याने ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे यांनी प्रशासनाकडे दाद मागितली . दरम्यान त्यांनी  आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने भीक मांगो आंदोलनही पुकारले होते . 

सदर सांत्वन शेड पूर्णत्वास आले असून भीक मांगो आंदोलनात दरम्यान १०३२ रुपयांचा निधी जमा झालेला होता . निधीचा विनियोग करून तसेच  कै .कासाबाई व कै . गोविंदा गणपत घोंगडे आणि कै . पंडित गोविंदा घोंगडे  यांच्या स्मरणार्थ घोंगडे परिवार पहुर यांच्यातर्फे सांत्वन शेडमध्ये बैठक बाक साकारण्यात आला . 

या बैठक बाकाचे आज आंदोलन करते विक्रम घोंगडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले . या प्रसंगी  विष्णू घोंगडे , अतुल राऊत अश्विन घोंगडे उपस्थित होते .


https://youtu.be/LoEg8N0W_Mk?si=JJagw9VsdjkIubhO

वरील लिंक क्लीक करा--

*पहूर कसबे स्मशानभूमीतील सांत्वन शेडचे काम पूर्णत्वास!!*


       *विक्रम घोंगडे यांच्या भीक मांगो आंदोलनाचे यश -*


 *आंदोलनातून जमा निधीतून बैठक बाकाचे लोकार्पण!!*


*काय म्हणाले सामाजिक कार्यकर्ते विक्रम घोंगडे?*

*व्हिडीओ नक्की बघा..लाईक करा!! आणि शेअर करा.*🙏


*वरील बातमी वाचण्यासाठी ब्लू लिंकला क्लीक करा*

*सत्य तेच---फक्त दिशा लाईव्ह न्यूज!!*

✍️....दिशा लाईव्ह न्यूज  ...✍️

****************************

Post a Comment

0 Comments