Type Here to Get Search Results !

माणुसकी समूहाचा आठवा वर्धापन दिन व चि.राम पंडित चा वाढदिवस मोठ्या थाटात रक्तदान शिबिराने व सेवा गौरव पुरस्कार सोहळ्याने झाला साजरा!! सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचा दरवर्षी स्तुत्य उपक्रम


दिशा लाईव्ह न्यूज -:-(दिनेश चौधरी, लोहारा.)       कार्यक्रमात शासकीय रक्तपेढी साठी दात्यानीं रक्तदान केले.रक्तसंकलन शासकीय रक्तपेढी घाटी यांनी केले.

या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित व गाडगेबाबां चे पुजन करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शरद सोनवणे यांनी केले,कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील ४२ मान्यवरांना सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.


( दिवाकर पाटील,नांद्रा. ता.जामनेर हे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना)

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.प्रकाश करमाडकर कुलगुरू,आर्यव्रत इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी त्रिपुरा,भारत हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून पंकजपाल राठोड महाराज,सप्तखजेरी वादक,ह.भ.प विजय महाराज गवळी,शाम कुमार वानखेडे समाजप्रबोधन कार,नंदा गायकवाड उपायुक्त म.न.पा.जालना,प्रवीणा यादव पोलिस निरीक्षक वेदांतनगर,सुनिल इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक,मनोज कदम,उद्योजक,सुनिल कोटकर,

प्रा.धोंडीरामसिंह राजपूत,विनायक कापकर.यांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार देवुन पुर्सकरार्थीना सन्मानित करण्यात आले.



या कार्यक्रमासाठी विशेष आकर्षण ठरले ते जूनियर चार्ली सोमनाथ सोनवणे यांनी "सावधान सावधान पोलीस है अपने साथी " या गीतातून मुख अभिनयातुन आपली कला सादर करून प्रमुख पाहुण्यांची मने जिंकली.तसेच सप्त खंजेरी वादक पंकजपाल महाराज राठोड यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले.तसेच ह.भ.प.विजय गवळी महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांचे चरणावर आधारित माणसात देव असणे गरजेचे आहे,तसेच काम माणुसकी समूह करत आहेत.गाडगे बाबा यांना अनेक जण नाव ठेवत होते, त्यांना आम्ही पहिले नाही मात्र सुमित पंडित यांचे काम तसेच असल्याने आधुनिक काळातील ते गाडगे महाराज आहेत अस म्हणावे लागेल. 

कोणाला शुभेच्छा देखील मनातून देण्याची वृत्ती राहिलेली नाही,असा काळात मनापासून सेवा करण्याचे काम माणुसकी समूह सुमित पंडित आणि पूजा पंडित करत असल्याने त्यांच्या कामाची दखल घेण्याची गरज आहे.



तसेच आध्यक्षिय भाषनात मार्गदर्शक करतांना प्रा.डॉ प्रकाश करमाडकर कुलगुरू म्हणाले कि "सुमित पंडित व पुजा पंडित यांचे माणुसकीचे कार्य हे मानवतेचे सर्वश्रेष्ठ कार्य सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या व माणुसकीचा आठव्या वर्धापन दिनानिमित्त एकत्र आलेलो आज सकाळीच रक्तदानाच्या पवित्र कार्याने सुरुवात होऊन पुढे विविध क्षेत्रात काम केलेल्या लोकांचा सत्कार करण्यात आला सुमित पंडित यांच्या कार्याची माहिती मला आत्ताच मिळाली कुष्ठरोग निर्मूलन आणि मानवतेची सेवा ह्या एका वेगळ्या विषयात हा आवलीया काम करत आहे त्याला त्याच्या कार्यात त्याची सहचरणी ही तेवढ्याच तुलामोलाची साथ देत आहे. येथे मला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले दापत्यांची आठवण होत आहे. सुमित व पूजा ताई हे आजच्या काळातील फुले आहे.मानव सेवाचा  विचार करताना,आपल्याला महात्मा बुद्ध,महात्मा बसवेश्वर,संत सेना महाराज,चोखामेळा,संत गाडगे महाराज,आणि बाबा आमटे यांसारख्या थोर व्यक्तींनी केलेल्या महान कार्याची आठवण होते.मानवतेची शिकवण आणि समाजकार्य,आजच्या काळातील सुमित पंडित माणुसकीचे तारणहार मतिमंद,  बेघर,वृद्ध अपंग माजाने दूर लोटलेल्यांना सुमित पंडित यांनी स्वाभिमानाने जगण्यासाठी आश्रय मिळवून दिला. जटवडा रोड,छत्रपती संभाजी नगर सारख्या ठिकाणी पंडित दांपत्याने यांची निर्मिती केवळ एक आश्रम नव्हे, तर ती एक क्रांती आहे."असे उपस्थीतांना आव्हान केले.

या कार्यक्रमात सुमित पंडित,गणेश क्षिरसागर,सोमनाथ स्वभावणे,कल्पेश पंडित,सह आदिनी रक्तदान केले.

 सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या ११ विषेश पुरस्कारार्थी प्रा.डॉ.प्रकाश करमाडकर कुलगुरू,ह.भ.प विजय महाराज गवळी,शाम कुमार वानखेडे,नंदा गायकवाड,प्रवीणा यादव,सुनिल इंगळे,शंकर वाघमोडे,सुनिल कोटकर,संजय खडागळे,अविनाश कानडजे,अमित सुभाषराव फुटाणे,व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ३१ मान्यवर विनायक कापकर,नरेंद्र सुरेशराव देशमुख,रामेश्वर सदाशिव राऊत,श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी (शैक्षणिक संस्था,संतोष झाल्टे,मनिषा जगदीश गोंडे,अमोल रत्नाकर सेठ,सुभाषचंद्र बाजीराव काळे,रविंद्र अशोक पगारे,महेंद्र भारत बारवाल,सुदाम राजाराम पवार,विष्णू विनायकराव मापारी,जालिंदर नाना केरे,

दशरथ एन सुरडकर,संदिप दादाराव मानकर,विनोद सुभाषराव चवरे,

दिवाकर नारायण पाटील,(  नांद्रा, ता.जामनेर) संध्या भगवानराव पारवे,

रामचंद्र कचरू भिवसने, (लोहारा, ता.पाचोरा. ह. मु. कल्याण.) आबासाहेब पुंडलिक पाटील,डॉ.आजम शहा,

स्व.कैलास नामदेवराव पावडे सर,

सुभाष शाहुबा जेठे,अरुण श्रीराम सोनवणे,

रुपाली दिपक वाघ,मोहन बंडू शिंदे,

त्रिवेणी बाबुराव कांबळे,जितेंद्र राजेश गवळी,डॉ.शांतीसागर किसनरा बिरादार,

चि.स्वराज दिपाली आतिष सोसे,

योगेश प्रभाकर भाले,डॉ.सचिन विष्णुपंथ साबळे,आदिनां मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार देन्यात आला.या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले ते मुक्ताराम गव्हाणे,समाजसेवक सुमित पंडित,गजानन क्षीरसागर,विजय निंबाळकर,कार्तीक वाघ,ज्ञानेश्वर पंडित,कल्पेश पंडित,पुजा पंडित,लक्ष्मी पंडित,आदिनी सहकार्य केले.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात केली.आभार प्रदर्शन समाजसेवक सुमित पंडित यांनी मानले,व सुत्रसंचालन बंद.सो.कांबळे यांनी केले.

-------------------------------------------------/-------------------------

******************†****************************

केस वाढवून बाँलीवुड चा हिरो बनण्यापेक्षा बुध्दी वाढुन फुले,शाहू,आंबेडकर थोर महापुरुषाचे प्रचारक बना!!

...सप्तखंजेरी वादक पंकजपाल राठोड महाराज यांचे आवाहन!!


सप्त खंजेरी वादक पंकज पाल महाराजांनी आपल्या वाणीतुन समाजाला प्रबोधनातुन उपदेश करतांना म्हणाले की समाजामध्ये डि.जे वर नाचून आनंदोत्सव साजरा केल्यापेक्षा वाचन आणि चिंतन सेवाभावी वृत्तीने आपलं जीवन सफल करा व अशा अनेक विषय हुंडाबंदी,व्यसनमुक्ती,बेटि बचाव बेटि पढाओ,समाज परिवर्तन,अंधश्रद्धा निर्मूलन,फुले शाहू आंबेडकरांचे विचार करा अश्या शब्दांत अनेक उदाहरणे देत तरुणांनो केस वाढवून बाँलीवुड चा हिरो बनण्यापेक्षा बुध्दी वाढुन

फुले,शाहू,आंबेडकर थोर महापुरुषाचे प्रचारक बना आणि माणसांनी माणसाशी माणसा प्रमाणे वागावे हा माणसाचा खरा तो एक धर्म संत तुकडोजी महाराजांच्या माणुस द्या मज माणुस,खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आपन एकता तरी जीवनात ग्रामगीता वाचलीच पाहिजे.

 साध्या पध्दतीने चालता बोलता कीर्तनातुन उपदेश दिले.ते कार्यक्रमात बोलताना म्हणाले की समाजसेवक सुमित पंडित यांनी जे माणुसकीचे छोटेसे वृक्ष लावले आहे आजच्या या कार्यक्रमातून सिद्ध होते की त्यांची कार्याचे फलीत कुठेतर वटवृक्ष झाले आहे आणि ही माणुसकी समूहाची टीम थांबणारी नाही तर समाजातील तळागाळातील गोरगरीब गरजूंना अहोरात्र मदत करणारी टीम आहे.असे मला वाटते इतर ठिकाणी पैसे करण्यात खर्च करण्यापेक्षा माणुसकी समूहाला ते दान करा आपल्याला निश्चितच माणुसकीचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही.

       ------सप्त खंजेरी वादक पंकज पाल महाराज.




Post a Comment

0 Comments