दिशा लाईव्ह न्यूज --::--येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया
तसेच शेंदुर्णी व पिंपळगाव हरेश्वर शाखे तर्फे 2.25 कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम पारस मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित कारण्यात आला.
मेघा ॲग्री आउट रिच प्रोग्राम अंतर्गत शेंदुरी येथे मेळावा अयोजित आयोजित करण्यात आला. या साठी लोहारा शाखा अधिकारी ऋषिकेश सरगर तसेच भगवान पवार पिंपळगाव शाखा व्यस्थापक, व कैलास खार्डे शेंदुर्णी यांच्या दृढ संकल्पनेतून सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या परिसरातील महिला बचत गट सक्षमीकरणाचा मेळावा आयोजित करण्यात आला.
या वेळी सुरुवातीला दीप प्रज्वलन व सेंट्रल बँक ऑफ इंडिया संस्थापक सोराबजी पोचखानवाला यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मेळाव्याची सुरुवात प्रार्थना व स्वागत गीतातून करण्यात आली.
मेळाव्यामध्ये लोहारा-शेंदुर्णी-पिंपळगाव परिसरातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहभाग नोंदविला.
या मेळाव्यात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यामध्ये तब्बल२कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज मंजुरी पत्र स्वयंसहायता बचत गटांच्या अध्यक्षा यांना देण्यात आले.
प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना यांसह बँकेच्या विविध सुविधांबद्दल व्यवस्थापक ऋषिकेश सरगर, सहव्यवस्थापक अनिकेत राऊत, कृषी अधिकारी सागर राजपूत, खजिनदार संदीप कुमार यांनी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी बँक सखी अरुणा धनगर, बँक मित्र भारत पाटील, समाधान मगरे, प्रल्हाद नामदेव चौधरी, संगीता पाटील यांच्यासह सीआरपी छाया डांबरे, सुषमा देशमुख, वर्षा चौधरी, आरती पाटील, पूजा राजपूत, निशा राजपूत, नलिनी पाटील, सीताबाई परदेशी व परिसरातील बचत गटांच्या अध्यक्षा, सचिव, सदस्य महिलावर्ग, पत्रकार मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप कुमार यांनी सूत्रसंचालन पत्रकार चंद्रकांत पाटील तर आभार बँक मित्र भारत पाटील यांनी मानले.


.jpg)






Post a Comment
0 Comments