Type Here to Get Search Results !

पाळधी चोरी प्रकरणी सात आरोपींना पोलिस कोठडी-पहूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.


पहूर प्रतिनिधी- ता. जामनेर.

  दिशा लाईव्ह न्यूज --::--  पाळधी ( ता . जामनेर )गावातील बँड व्यवसायिकाच्या बँडचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी पहूर पोलिसांनी सात संशयितांना अटक करून तब्बल सहा लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


या प्रकरणी बँड व्यावसायिक राहुल सदाशिव माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी रात्री बँड साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.


गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत

भूषण प्रकाश पाटील, आर्यन विलास पाटील, ज्ञानेश्वर अशोक पाटील, शुभम ज्ञानेश्वर पाटील, विशाल प्रकाश भुसारी, निखिल विनोद पाटील व वैभव रघुनाथ पाटील या सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले साहित्य जप्त करण्यात आले.


ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील विनोद पाटील, गोपाल माळी, राहुल पाटील, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी तसेच एलसीबीचे ईश्वर पाटील व राहुल महाजन यांनी केली.


या प्रकरणाचा पुढील तपास सुभाष पाटील करत आहेत. शनिवारी आरोपींना जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Post a Comment

0 Comments