Type Here to Get Search Results !

धोक्याची घंटा ! पहूर येथे लेले नगरातील डीपी जीवघेणी ठरण्याची शक्यता. या जीवघेण्या डीपीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?


पहुर  प्रतिनिधी--ता. जामनेर.

 दिशा लाईव्ह न्यूज --::--  पहुर कसबे येथील लेले नगरात क्षत्रीय माळी समाज मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेली वीज वितरण पेटी (डीपी) गंभीर धोक्याची कारण ठरत आहे. अवघ्या एक फूट अंतरावर जमिनीजवळ असलेली ही डीपी पावसामुळे पाण्याच्या संपर्कात येऊन कधीही शॉर्टसर्किट होण्याची व करंट जमिनीत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.


या धोकादायक डीपीजवळून आर.टी. लेले हायस्कूल व उर्दू शाळेत जाणारी शेकडो मुले रोज जातात. तसेच लोहारा  रस्त्यावरील नागरिकांचा वर्दळ असलेला हा मुख्य रस्ता आहे. इतका धोका असूनसुद्धा अद्याप संबंधित विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही.


शोकांतिका अशी की, याच मार्गाने गावातील प्रतिष्ठित नागरिक व राजकारणी वर्ग सतत वावरत असूनही त्यांनीही या प्रश्नाकडे डोळेझाक केली असल्याचा आरोप सामाजिक प्रसार माध्यमांद्वारे  नेटीजन्सने केला आहे . एखादी जीवघेणी दुर्घटना घडून गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

Post a Comment

0 Comments