Type Here to Get Search Results !

पर्युषण पर्वात अंबे वडगाव येथील कु. वैष्णवी चोपडा (जैन) हिचा अन्नत्याग उपवास




पहुर प्रतिनिधी--ता जामनेर.


 दिशा लाईव्ह न्यूज। --::-- दिनांक २१ ऑगस्ट २०२५ गुरुवारपासून श्र्वेतांबर व स्थानकवासी जैन बांधवांचे पर्युषण पर्व सुरु झाले आहे. भारतीय संस्कृतीत हा पर्व त्याग, संयम आणि आत्मचिंतनाचा महिमा अधोरेखित करणारा आहे. आजच्या युगात भौतिक प्रगतीच्या शिखरावर पोहोचताना भावनिक व वैचारिक नाती तुटू लागल्याची खंत व्यक्त होत असताना, जैन धर्मग्रंथांमधील दशलक्षण धर्म समाजमनाला सतत जागरूक करण्याचे कार्य करतो.


धार्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून जनजागृती करण्याकरिता पर्युषण पर्व साजरा केला जातो. अन्य धर्मात उत्सव हा भोगप्रधान विधी ठरतो, तर जैन धर्मातील पर्व हे त्याग, वैराग्य, संयम व अहिंसेचे प्रतीक ठरतात.


या पावन पर्वाचे औचित्य साधून पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील रहिवासी दिलीप चोपडा (जैन) यांची सुपुत्री कु. वैष्णवी चोपडा (जैन) हिने दिनांक २० ऑगस्ट २०२५ बुधवारपासून अन्नत्याग करून उपवासाला सुरुवात केली आहे. सात दिवस चालणाऱ्या या उपवासाची सांगता दिनांक २७ ऑगस्ट २०२५ बुधवार रोजी पाचोरा येथील जैन स्थानकांमध्ये करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments