दिशा लाईव्ह न्यूज। --:::-- विघ्नहर्ता गणरायाचे आज घराघरात आगमन होणार असल्याने लोहारा व पहूर बाजारपेठेत आज उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.
गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य तसेच सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी बसस्थानक परिसरातील बाजारपेठेत सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ग्राहकांची लगबग आणि विक्रेत्यांचा उत्साह यामुळे बाजारपेठ रंगतदार झाली होती.
दरम्यान, वरुणराजानेही आज हजेरी लावल्याने गणेशभक्तांचा उत्साह अधिक दुणावला आहे.


Post a Comment
0 Comments