बाळू जोशी,वाकडी.ता.जामनेर.
दिशा लाईव्ह न्यूज। --::---- दि.२७/०८/०२५ वाकडी येथे सलग एक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे, नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होत आहे,आठ ते दहा वर्षांपासून गावाला पाणीपुरवठा तोंडापूर वडाळी येथील धरण येथून होत असल्याने या ठिकाणी धरण्याचा पाञामध्येच पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदकाम झालेले आहे,
परंतु विहीर धरणाच्या पाञात असून सुद्धा विहिरीत पाणी नसल्याने तसेच याठिकाणी एक बोअरवेल केलेली असून ती बोअरवेल बंद अवस्थेत असलेल्या कारणाने सरळ धरणाच्या पाञामधून दूषित पाणी विहिरींमध्ये टाकून पाणीपुरवठा होत असल्याने गावातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा झाल्याने ते पाणी पिण्यास योग्य नाही,
ग्रामपंचायत चा माध्यमातून गावांमध्ये दवंडी मिरवण्यात आली होती,हे पाणी वापरायचे आहे, तरी पण बहुतेक नागरिक पाण्याला उकळून ते पीत आहे,
यामुळे गावांमध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे, तसेच दूषित पाणी असून सुद्धा आठ ते दहा दिवसांनी गावाला पाणीपुरवठा होत असतो,
ग्रामपंचायतील स्थाविक ग्रामसेवक नसुन व सरपंच येथे राहात नसून जामनेरला असतात, नागरिकांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडावे?सध्या येथील ग्रामपंचायत रामभरोसे चालू असल्याचे चित्र ग्रामस्थांना दिसत आहे.
प्रत्येक गल्लीमध्ये अनेक गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तसेच गावांमध्ये असलेले आमदार निधीतील हायमस्ट, लॅम्प बंद अवस्थेत पडलेले आहेत,
गावातील बराच ठिकाणी लाईट बंद आहे,या सर्व समस्या ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सोडवावे,
तसेच तलाठी कार्यालया जवळ असलेल्या राष्ट्रीय झेंडा ज्या ठिकाणी लावला जातो, त्याठिकाणी सुध्दा गटारी पाणी जमा होताना दिसत आहे,
प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी येथे एक सुध्दा डॉक्टर व कर्मचारी मुक्कामी नसतो .पंचक्रोशीतील सर्व मोठ्या दवाखाना म्हणून प्रसिद्ध आहे असा अनेक समस्यांच्या सामान्य गावातील लोकांना करावा लागत आहे,या संबंधीत अधिकारी यांनी गावाकडे लक्ष्य देऊन ग्रामस्थांच्या समस्या निरसन करावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.





Post a Comment
0 Comments