पहूर प्रतिनिधी- ता जामनेर.
दिशा लाईव्ह न्यूज --::- शेंदुर्णी येथील शाळेत इ . १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने अत्याचार करून मानवतेला काळीमा फासल्याच्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
पाचोरा तालुक्यातील विद्यार्थिनी शेंदुर्णी येथील शाळेत इयत्ता दहावी शिक्षणासाठी येत होती. स्कूल बस चालकाने तिच्यावर अत्याचार करून मानवतेला काळीमा असला. ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेच्या निषेधार्थ पहूर शहर पत्रकार संघटनेच्या वतीने त्या नराधमाला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते यांना निवेदन देण्यात आले. या
प्रसंगी पहूर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. संभाजी क्षीरसागर , उपाध्यक्ष जयंत जोशी , ज्येष्ठ पत्रकार शरद बेलपत्रे, प्रवीण कुमावत, ईश्वर हिवाळे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
या निवेदनावर सचिव गीता भामेरे , ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, मनोज जोशी, रवींद्र लाठे, सादिक शेख, रवींद्र घोलप यांच्यासह सर्व पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Post a Comment
0 Comments