Type Here to Get Search Results !

अहो आश्चर्यम! चाळीस लाखांचा पूल... बांधकाम चक्क ‘कच’ मध्ये! दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल!! परिसरातील शेतकरी संतप्त.




पहूर प्रतिनिधी (ता. जामनेर) :

दिशा लाईव्ह न्यूज---::---  जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात विविध विकास कामे सुरु असताना, ग्रामसडक योजनेतून वाघमाऱ्या नाल्यावर सुमारे ४० लाख रुपये खर्चून बांधला जाणारा पूल हा वाळूऐवजी १००% कच वापरून बांधला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.


या कामामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल करत त्यांनी या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे.



सांगवीपासून लाखोली गावाला जोडणाऱ्या मार्गावर वाघमाऱ्या नाल्यावर हे बांधकाम सुरू असून, शेतकरी अशोक विठ्ठल जाधव यांनी कामाची सदोषता निदर्शनास आणली आहे.  बोलताना त्यांनी सांगितले की,

> “हा रस्ता शेतकरी, वाहतूकदार मोठ्या प्रमाणावर वापरतात. वाळूऐवजी माती-मिश्रित कच वापरला जातोय. जर एखादी दुर्घटना घडली, तर याचे उत्तरदायित्व कोण घेणार?”

तसेच त्यांनी सांगितले की,

> “कंत्राटदाराकडे कामाचे इस्टिमेट मागूनही ते दिलं जात नाही. हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं असून, तात्काळ चौकशी करून काम थांबवावं.”

या प्रकरणी कंत्राटदार श्री. दिग्विजय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट सांगितले की,


“हे काम शंभर टक्के आरटीफिशियल कचमध्येच मंजूर झालेलं आहे. त्यामुळे आम्ही कच वापरत आहोत.”


मात्र नागरिकांचा सवाल असा आहे की, जर खरोखर आरटीफिशियल कच वापरणं अधिकृतपणे मंजूर असलं तरी याचे परिणाम, सुरक्षा मापदंड आणि निकष पाळले गेले आहेत का?

स्थानिक प्रशासनाने या प्रकाराची तात्काळ चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासावी, अशी जोरदार मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.



Post a Comment

0 Comments