Type Here to Get Search Results !

म्हसास ता.पाचोरा येथे आज ऋषीपंचमीच्या दिवसी मरीआई मातेची यात्रा व रात्री लोकनाट्य तमाश्याचे आयोजन .




भारत पाटील -म्हसास                 

 दिशा लाईव्ह न्यूज --::-- पाचोरा तालुक्यातील लोहारा येथून जवळच असलेल्या  म्हसास येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही ऋषीपंचमीच्या दिवसी दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी यात्रेचे आयोजन ,व भिमा नामा अंजाळेकर यांचा लोकनाट्य तमाशा व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.



या यात्रेनिमित्त गावातील महिला देवीला गोडधोड नैवेद्य देतात व नारळ फोडतात, त्या दिवशी घरोघरी गोडधोड जेवणाचा खमंग स्वाद घेतला जातो, 

तसेच यात्रेच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता तमाशा मंडळ हे आजुबाजुच्या परिसरातून येणाऱ्या यात्रेकरू साठी व गावातील ग्रामस्थांनसाठी तमाश्याची हजेरी स्वरूपात मनोरंजन केले जाते,तर आज  रात्री ९ वाजता तमाशा शालिक व शांताराम रोहिणीकर आहे 

 लोकनाट्य तमाश्याचे कार्यक्रम श्री हनुमान मंदीरा जवळ ठेवण्यात आले आहे.    



              या यात्रोत्सवानिमित्त म्हसास गावातील बाहेरगावी नोकरी, व्यवसायानिमित्त असलेले ग्रामस्थ, नातेवाईक मंडळी यात्रोत्सवात सहभागी होतात, 

यात्रोत्सवात परिसरातील बहुतांश लोक, गावातील नागरिक, महीला, तरुण मंडळी यांची मोठ्या संख्येने गर्दी असुन यात्रेचा लाभ घेतात,यात्रेत हाँटेल खेळण्याची दुकाने, भांड्यांची दुकाने, कटलरी दुकाने,पाळणे आदी विविध दुकानांची मांडणी केलेली असते,



म्हसास गावाच्या  यात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे, यात्रोत्सवाचे आयोजन ग्रामस्थ, ग्रामपंचायत,पंच कमिटी आदी करतात व यावेळी  गावातील तरुण वर्गाचे व ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभत असते.



Post a Comment

0 Comments