सौ. गिता भामेरे, पहूर (ता. जामनेर) –
दिशा लाईव्ह न्यूज --::-- जामनेर तालुक्यातील पवित्र स्थळ श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात ऋषिपंचमीच्या निमित्ताने भक्तिभावात वातावरण अनुभवायला मिळाले. महिलाभाविकांनी संगमस्थळी स्नान करून शिवलिंगास जलाभिषेक करत धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.
देवळी आणि गोगडी या दोन पवित्र नद्यांचा संगम असलेल्या संगमेश्वर मंदिर परिसरात आजच्या दिवशी विशेष गर्दी होती. या नैसर्गिक संगमावर महिलांनी पवित्र स्नान करून धार्मिक परंपरेचे पालन केले.
कार्यक्रमात लिलाबाई सोनार यांनी हरितालिका व्रतकथा ग्रंथाचे पारायण केले. उपस्थित महिलाभाविकांनी श्रद्धेने ग्रंथ श्रवणाचा लाभ घेत, व्रतपरंपरेचा गौरव केला.
या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात अध्यात्मिक वातावरण तयार झाले होते. ऋषिपंचमीच्या निमित्ताने पार पडलेल्या या कार्यक्रमाने भक्तांमध्ये नवी ऊर्जा आणि सकारात्मकता निर्माण केली. आलेल्या भाविकांचे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे विश्वस्त किशोर बनकर, ईश्वर हिवाळे यांनी स्वागत केले.

Post a Comment
0 Comments