दिशा लाईव्ह न्यूज --::-- 'चार दिवस सासूचे', 'या सुखांनो या', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है', अशा मालिकांत तिनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. 'तुझेच मी गीत गात आहे' ही तिची अखेरची मालिका तर 'अ परफेक्ट मर्डर' हे शेवटचं नाटक ठरलं.
प्रियाला आदरांजली वाहताना सुबोध भावेनी प्रिया त्याची बहीण असल्याचं म्हटलं आहे. प्रियाची परिश्रम घेण्याची तयारी आणि कामावरची तिची श्रद्धा या दोन गोष्टी कौतुकास्पद होत्या असं सुबोध भावेनी म्हटले आहे.
सुबोध भावे म्हणतो, "या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत, कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सर च निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली.पण त्या कॅन्सर ने काही तिची पाठ सोडली नाही."
'तू भेटशी नव्याने' या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता. "माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली. तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना," अशा शब्दात सुबोध भावेनं आपल्या भावना व्यक्त केल्या.


Post a Comment
0 Comments