Type Here to Get Search Results !

आ. किशोर पाटील यांच्या आश्वासनानंतर पत्रकार संदीप महाजन यांचे उपोषण मागे..दोषींवर कारवाई करण्याचे दिले आश्वासन!!




दिशा लाईव्ह न्यूज --::-- पाचोरा प्रतिनिधी ---पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेले तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान खोट्या खात्यांमध्ये वळविल्याचा प्रकार येथील पत्रकार  संदीप महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उघडकीस आला आहे. 

महसूल विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मूळ शेतकऱ्यांना हक्काचा निधी न मिळाल्याने  तालुक्यातील  शेतकर्यांचा संताप  उसळला आहे.


या प्रकरणात दोषींवर निलंबन, आर्थिक गुन्हा शाखेमार्फत चौकशी तसेच चुकीच्या  खात्यात गेलेली रक्कम खऱ्या शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागण्यांसाठी महाजन यांनी सोमवारी, १ सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

 उपोषणाला स्थानिक नागरिकांसह शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळाला.

 यावेळी तालुक्याचे  आ. किशोर पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कठोर कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर  संदीप महाजन यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. 

घोटाळ्यामुळे प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा उघडकीस आला आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी पारदर्शक प्रणाली राबवावी, अशी जनतेची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments