Type Here to Get Search Results !

गिरणा धरणाची पाण्याची पातळी 93: 55 टक्के. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा.

 


             

दिशा लाईव्ह न्यूज -:-  जळगांव व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले गिरणा धरणाच्या पाण्याची पातळी ही 100% कडे वाटचाल चालू आहे.

  काही दिवसापासून गिरणा धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे गिरणा धरण हे 93 ;55 टक्के भरलेला असून पाण्याची आवक अशी सुरू राहिली तर गिरणा धरणातील पाण्याचा साठा 100% केव्हाही होऊ शकतो.

 त्या अनुषंगाने गिरणा धरणातील अतिरिक्त पाणी गिरणा नदीच्या पात्रात सोडणे धरणाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक आहे .त्यामुळे गिरणा धरण 100% भरल्यानंतर अतिरिक्त पाणी हे गिरणा नदीच्या पात्रात सोडण्यात येईल.

 तरी सुरक्षितेच्या दृष्टीने गिरणा नदीच्या काठावर असलेल्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव कार्यकारी अभियंता वि प्र पाटील यांनी एका पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी टंचाई शाखा जळगाव यांना कळवले आहे.

Post a Comment

0 Comments