Type Here to Get Search Results !

No title

 अबब . . . २२ लाखांची मोरी . . .

पहिल्याच पुरात झाली दैना 


अभियंत्यांची चौकशी करून

ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी!!


काम निकृष्ट झाल्याचा संतप्त शेतकऱ्यांचा आरोप .




पहूर ता जामनेर 

दिशा लाईव्ह न्यूज --::--- जामनेर तालुक्यातील पहूर येथे सांगवी शिवारात वाघमाऱ्या नाल्यावर  मागील वर्षी उभारण्यात आलेल्या सुमारे २२ लाख रुपयांच्या मोरीची पहिल्याच पुरात दैना झाली असून शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे . 

     सांगवी शिवारात वाघमाऱ्या नाला वाहतो . या नाल्यावरून असंख्य शेतकरी ये - जा करतात . गेल्या वर्षी या नाल्यावर सुमारे २२ लाख रुपये खर्चून मोरी उभारण्यात आली . 



मात्र पहिल्याच पुरात या मोरीची दैना झाली असून दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला आहे . 

या मोरीवरून  साधे ट्रॅक्टर व्यवस्थित जाऊ शकत नाही तर मालाचा ट्रक कसा जाणार असा प्रश्न संतप्त प्रश्न करून संबंधित अभियंत्यासह ठेकेदाराची चौकशी करण्याची व ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्याची मागणी शेतकरी संजय जाधव यांनी केली आहे .

           वाहून गेलेला भराव दाखविण्यासाठी शेतकरी  अशोक जाधव , किशोर पाटील , राहुल बनकर उपस्थित होते .

शासनाचे लाखो रुपये अशाप्रकारे उधळणाऱ्या संबंधितांवर काय कारवाई होणार? याकडे गावाचे लक्ष लागून आहे . 

विकास योजनांना कमिशन खोरीची वाळवी लागली असल्याने अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप युवा  शेतकरी  राहुल बनकर यांनी केला आहे .

सध्या टक्केवारीचे प्रमाण खुप वाढले आहे.त्यामुळेच अशी नित्कृष्ठ दर्जाची कामे जोरात चालू आहे. कोण कोटी कमिशन घेत? हे आता जनतेला सांगण्याची आवश्यक नाही.  

जो शेतकरी किंवा नोकरदार उभ्या आयुष्यात आपल्या कुटुंबासाठी घर बांधतो...हे टक्केवारी आणि कमिशनखोर यांचे घर बघा...असाही संतप्त सवाल शेतकऱ्यांनानी व्यक्त केला आहे.

संबंधित अधिकारी त्वरित या कामाकडे लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला ब्लँक- लिस्ट मध्ये टाकावे अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments