Type Here to Get Search Results !

वाकडी,ता.जामनेर येथे उद्या कुस्ताची दंगल



दिशा लाईव्ह न्यूज (बाळू  जोशी )वाकडी.ता.जामनेर.दि.२२/०८/०२५ वाकडी येथे पोळा पाडवानिमत्ते व डाकोबा याञेनिमित्त एक लाख रुपयांची कुस्तांची जंगी लूट दि.२३ रोजी दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत तळेगाव रोड वाकडी येथे होणार आहे, 

जलसंपदामंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंञी गिरीश महाजन यांच्या हस्ते कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन होणार आहे.यावेळी समाजसेवक विमुक्त भटक्या जमातीचे समाज भूषण सुमितजी जोशी यांच्या कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,

 प्रमुख पाहुणे म्हणून जे.के.चव्हाण,भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, वाकडी पोलीस पाटील घनश्याम पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत,सर्व कुस्ती प्रेमी मल्लांनी येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments