शिवाजी सुतार--::-बांबरुड राणीचे, ता. पाचोरा
दिशा लाईव्ह न्यूज --::-- येथील शेती शिवारातच नव्हे तर गावाच्या परिसरातच प्रत्यक्ष वाघोबाचे दर्शन झाल्याने शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आह. आज पावेतो शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले बिबट्याने गुरांवर, कुत्र्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पडल्याच्या घटना घडल्या परंतु दि. २७ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना, मजुरांना प्रत्यक्ष वाघाच दिसल्याने चांगलाच घाम फुटला. त्याने शेती शिवारातील बांधलेल्या शेडमध्ये हजेरी लावून गुरांचा वासरांचा फडशा पाडला.
यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभाग मात्र स्वस्त असल्याचे व या वाघाकडून एखाद्या शेतकरी, शेतमजुराचा खात्मा होईल एखादी अप्रिय घटना होईल तेव्हाच वन विभागाला जाग येईल काय असा संतप्त सवाल शेतकरी वर्गात शेतमजुरांमध्ये उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेती शिवारातील पिके केळी, मका आदी पिके मोठी झाली असून सर्वत्र हिरवळीचे साम्राज्य पसरले आहे. यात शेतकऱ्यांना व शेतमजुरांना शेती काम करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच २७ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना व शेतमजुरांना प्रत्यक्ष वाघाचे दर्शन झाल्याने भीती निर्माण झाली आहे. अद्याप शेती शिवारातच अशा प्राण्यांचे वास्तव्य होते,
परंतु काल सौ. संगीताबाई अनिल सांगळे या महिला खडके शिवारातील आपल्या शेतात कपाशी पिकात काम करत असताना प्रत्यक्ष वाघच बसलेला आढळला तर लोहारा रस्त्यावर गावालगत असलेल्या स्मशानभूमी जवळील पप्पू नंदलाल जगताप यांनी बांधलेल्या शेड रस्त्यावरच संध्याकाळी सागर पाटील हा शेतकरी शेतात जात असताना रोडावरच मध्यभागी ठाण मांडून बसलेला प्रत्यक्ष दिसला तर त्याच शिवारातील अवधूत पाटील यांच्या शेड मधील जनावराचा खात्मा केला तसेच बांबरुड होऊन लोहारामार्गे जाणारे मुक्ताईनगर येथील वाहन चालकांनी हॉर्न वाजून सुद्धा जागच्या जागेवरच डरकाळी फोडली तर वाहनधारकांनी आपल्या वाहन लागलीच परतवून जळगाव मार्गे मुक्ताईनगर गेले सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
हा बिबट्या नसून वाघच आहे असे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले. शेती शिवारात गुरांवर हल्ले करून त्यांचा खात्मा करण्याचा सपाटा या प्राण्याचा सुरू असून शेतकऱ्यांनी वन विभागाचे संपर्क साधला असता तुम्ही तक्रार करा अशी उडवा उडवीची उत्तरे मिळत असून या वाघाने एखाद्या शेतकऱ्याचा अथवा शेतमजुराचा मुडदा पाडल्यावरच संबंधित विभागाला जाग येईल काय? असे संतप्त भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केले जात आहे.
या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी, शेतमजुर व ग्रामस्थातर्फे करण्यात येत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी व शेतकरी शेतमजुरांना चिंतामुक्त करावे, अशी मागणी संभाजी पाटील, संजय वाघ यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.



Post a Comment
0 Comments