Type Here to Get Search Results !

पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक यांची सेवापुर्ती निमित्त पत्रकारांतर्फे कर्तुत्व सोहळा संपन्न!!



 कुऱ्हाड प्रतिनिधी --::--सुनील लोहार.

 दिशा लाईव्ह न्यूज --::-- पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे. येथील कर्तव्यदक्ष पीएसआय सर्जेराव क्षीरसागर हे आपल्या 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून पिंपळगाव पोलीस स्टेशनला सेवानिवृत्त झालेत. 

येथील पोलीस स्टेशन ला  त्यांनी जवळपास एक वर्षभर इमाने इतबारे  सेवा दिली.अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. या अनुषंगाने शुक्रवार सकाळी अकरा वाजता पिंपळगाव हरेश्वर परिसरातील पत्रकार संघातर्फे त्यांच्या सेवापूर्ती निमित्त सन्मानाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.


यावेळेस  परिसरातील पत्रकार बंधू कडून त्यांचा शाल,बुके व घड्याळ भेट तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र प्रतिनिधी संदीप पाटील यांच्याकडून श्री स्वामी समर्थ महाराज प्रतिमा भेट देऊन साहेबांना सन्मानित करण्यात आले. 

गेल्या एक वर्षापासून पी एस आय श्री.क्षीरसागर हे पिंपळगाव हरेश्वर येथे आपली सेवा बाजवत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत सर्वांना समजून आपले  चोख कार्य  बजावले ,

तसेच पत्रकार बांधवांना देखील त्यांनी सन्मानाची वागणूक दिली.या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असलेल्या  एपीआय  सौ.कल्याणी वर्मा  यांनी आपल्या मनोगतात साहेबांच्या कार्याचा गौरव केला. पत्रकार संघाचे किशोर लोहार, उत्तमराव मनगटे , सुनील लोहार  यांनी सुद्धा  त्यांच्या मनोगतात श्री. क्षीरसागर यांच्याबद्दल  कृतज्ञता व्यक्त केली. 

यावेळी पोलीस उप निरीक्षक विठ्ठल पवार, पत्रकार  रविशंकर पांडे,  हेमशंकर तिवारी ,गजानन  लाधे, भिकन पाटील शिंदाड, रोशन जैन ,विनोद पाटील तसेच कडे  वडगाव येथील भाजपा आध्यात्मीक आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील, गजानन तेली, व पोलीस कर्मचारी स्टॉप उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments