Type Here to Get Search Results !

पहूर येथे ग्रामदैवत मरीआई मातेच्या दर्शनासाठी महिला भाविकांची गर्दी




 पहूर प्रतिनिधी, ता. जामनेर

दिशा लाईव्ह न्यूज --::-- पहूर कसबे येथील ग्रामदैवत मरीआई माता मंदिरात आज पोळ्याच्या दिवशी महिलांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली. पारंपारिक पद्धतीनुसार ‘बोण्याचा नैवेद्य’ मरीआई मातेस अर्पण करण्याची शतकानुशतकांची परंपरा आजही उत्साहात पाळली गेली.



देवस्थान ट्रस्टतर्फे आलेल्या भाविकांचे ट्रस्ट अध्यक्ष श्रावण कुमावत यांनी स्वागत केले. पंचपक्वानाने सजवलेले बोण्याचे नैवेद्य भक्तिभावाने अर्पण करण्यात आले.


सकाळपासूनच महिला भगिनींनी दर्शनासाठी मोठी उपस्थिती दर्शवली होती. धार्मिक वातावरणात मरीआई मातेस ‘बोण्याचा नैवेद्य’ अर्पण करून महिलांनी आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

Post a Comment

0 Comments