हेमंत चौधरी ,पाचोरा,
दिशा लाईव्ह न्यूज --::-- पाचोरा येथील पंपिंग रोड परिसरातील बळीराम पाटील नगरात नव्याने उभारण्यात आलेल्या *श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिराची* निर्मिती, प्राणप्रतिष्ठा, मिरवणूक आणि भंडारा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. श्री हनुमानजींच्या कृपाशीर्वादाने आणि सर्व भक्तगण, दानशूर आणि नागरिकांच्या सहभागाने हे ऐतिहासिक कार्य यशस्वी झाले.
मिरवणूक आणि कीर्तनाने रंगला परिसर.
दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सकाळी १०:०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मिरवणुकीत वारकरी संप्रदायातील बाळ गोपाळ, भक्तगण आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात मिरवणुकीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाला.
प्राणप्रतिष्ठा आणि महाप्रसाद.
दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. संध्याकाळी ६:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत महाप्रसाद आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला उपस्थित भक्तांनी श्री हनुमानजींच्या दर्शनाचा लाभ घेतला आणि प्रसादाचा आनंद लुटला.
सर्वांचे सहकार्य आणि योगदान
“एकट्या माणसाने हे शक्य नव्हते, पण सर्वांनी मनापासून हातभार लावल्यामुळे हे कार्य घडून आले,” असे मत श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिर निर्माण समितीने व्यक्त केले.
समितीचे
श्री. भास्कर नाना पाटील ( अध्यक्ष)
श्री.संजय राजगुरे, (उपाध्यक्ष)
श्री. हिरालाल परदेशी*,(सचिव)
श्री. निलेश मराठे*(सदस्य),
श्री. हेमंत चौधरी (सदस्य),
श्री. नितीन सुरेश पाटील( सदस्य),
श्री. आण्णासो प्रकाश चौधरी*(सल्लागार),
श्री. संजय मुळे*(सल्लागार),
श्री. पंकज चौधरी*(सदस्य),
श्री. उमेश वाघ*(सदस्य),
श्री. राजू सावंत*(सल्लागार),
श्री. संदीप राणा*(सल्लागार), ,
श्री. नाना शिंदे*(सल्लागार)
यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यात मोलाचे योगदान दिले. मंदिराचे संपूर्ण बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर इंजिनीयर प्रमोद पाटील यांचेही विशेष आभार मानण्यात आले.
आमदार किशोरआप्पा पाटील यांचे योगदान!!
आमदार मा. किशोरआप्पा पाटील यांच्या विशेष संकल्पनेतून शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि मंदिर परिसरातील ओपन स्पेसचे सुशोभीकरण तसेच सभामंडप उभारणीचे कार्य शक्य झाले. मंदिर समितीने त्यांचा मन:पूर्वक आभार आणि अभिनंदन व्यक्त केले.
सहभागी कार्यकर्ते आणि भक्तगण.
मिरवणूक, प्राणप्रतिष्ठा आणि भंडारा कार्यक्रमात श्री. जगदीश सोनवणे, श्री. राजूभाऊ धनराळे, श्री. सुमित चौधरी, श्री. आबा (बजरंग) चौधरी, श्री. सोपान पाटील, श्री. मनोरे साहेब, श्री. चंद्रकांत पाटील, श्री. जितेंद्र साळवे, श्री. आनंदा ढवळे, श्री. गोकुळ पाटील, श्री. शुभम परदेशी, श्री. नानू चित्ते, श्री. अमोल वाघ, श्री सुधाकर चौधरी,श्री. मुन्ना शिंदे, श्री. भरत भेरु, श्री. महावीर महाराज, श्री. रोहिदास आदिवाल, श्री. गणेश शिंदे, श्री. मयूर चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि भक्तगणांनी सहभाग घेतला. तसेच वारकरी संप्रदायातील सर्व बंधू-भगिनींचेही आभार मानण्यात आले.
पुढील वाटचाल
श्री इच्छापूर्ती हनुमान मंदिर समितीने भविष्यातही अशाच भक्तिमय आणि सामाजिक कार्यांना गती देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. श्री हनुमानजींच्या कृपेने आणि सर्वांच्या सहकार्याने पाचोरा येथील हा परिसर आध्यात्मिक आणि सामाजिक केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला.












Post a Comment
0 Comments