Type Here to Get Search Results !

लोहारा येथे साध्या पद्धतीने पोळा साजरा-पावसानेच पोळा फोडला.


लोहारा येथील  आदर्श शेतकरी श्री शंकर नामदेव सोनवणे (माळी ) 

दिशा लाईव्ह न्यूज --::-- लम्पी आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार आज लोहारा येथे पोळा उत्सव शेतकरी बांधवांनी  साधेपणाने साजरा करण्यात आला.

येथील पोलीस पाटील पद गेल्या महिन्यापासून रिक्त आहे. त्यामुळे पोळा फोडेल कोण? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता.

मात्र जळगांव जिल्हाधिकारी, पंचायत समिती, पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन यांचे पत्र लोहारा ग्रामपंचायतला प्राप्त झाले होते.

त्यामुळे लोहारा सरपंच अक्षय जैस्वाल यांनी कालच पोळा व लम्पि आजारा संदर्भात लोहारा गावात तशी दवंडी व सोशल मीडियावरून ग्रामस्थांना सूचना दिली होती.

शेतकरी बांधवांनी आपापले बैल वेशीतून काढून विधिवत पूजा केली.मात्र बरोबर 5 वाजता निसर्गाची कृपा होऊन बळीराजाताच्या अंगावर पाऊस पाडून बळीराज्याचे स्वागत केले.



बैलांना स्नान घालून पारंपरिक पद्धतीने सजविण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून बैलांचे औक्षण करण्यात आले.

दरवर्षी थाटामाटात साजरा होणारा हा सण यंदा प्रथमच साधेपणात पार पडला. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सामाजिक जबाबदारी जपल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पिंपळगाव हरे पोलीस स.पो.नि. कल्याणी वर्मा,लोहारा दुरक्षेत्राचे मोरे. व त्यांच्या सहकाऱ्यांनी,तसेच सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी  शेतकरी बांधवावांचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.


Post a Comment

0 Comments