Type Here to Get Search Results !

रोटवद,ता.जामनेर येथे आज मारुतीरायाची भव्य यात्रा, जिल्हाभरातून गर्दी!



दिशा लाईव्ह न्यूज -:- जामनेर तालुक्यातील रोटवद येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारुतीरायाची भव्य यात्रा भरते. सदर  यात्रेनिमित्त दर्शनासाठी संपूर्ण जिल्हाभरातून हजारो भाविकांची गर्दी असते.

 गावातील प्रत्येक घरातील उद्योग, व्यवसाय व नोकरी निमित्त बाहेर गेलेले सर्वजण यात्रेसाठी उपस्थित असतात. गावातील प्रत्येक घरी पाहुण्यांची गर्दी असते. - सालबादाप्रमाणे दरवर्षी पोळ्याच्या - तसेच दुसऱ्या दिवशी बाशिंग बांधलेल्या बैलांची गावातून भव्य मिरवणूक निघते. एखाद्या आजारातून किंवा संकटातून एखादा बैल बाहेर निघावा यासाठी मारुती रायाला साकडे घातल्यानंतर जर तो बैल त्यातून सुखरूप बरा झाला तर बाशिंग बांधलेल्या बैलाची पोळ्याला व - यात्रेच्या दिवशी मिरवणूक काढेल. - असे साकडे घातले जाते.



 यात्रेनिमित्त पोळ्याच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत मारुतीरायाला लोणी - मिश्रित शेंदूर लावून सजावट केली - जाते. यात गावातील वयस्कर जुने - मंडळी तसेच तरुण व बालवृद्धांचा उत्साहाने सहभाग असतो. नवसाला - पावणारा, महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती तसेच स्वयंभू व जागृत मास्ती - अशी अशी मंदिराची ओळख आहे. - आज जिल्ह्यातील भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज आहे.


रोटवद येथील नवसाला पावणाऱ्या स्वयंभू मारुतीची भव्य मूर्ती.

मध्यरात्री बारा वाजता महाआरती होऊन सांगता


यात्रेनिमित्त विविध खाद्यपदार्थांचे तसेच खेळण्यांचे व इतर दुकानांच्या माध्यमातून मोठी उलाढाल होते. दुपारी तीन वाजेनंतर बाशिंग बांधलेल्या बैलांची गावातून मिरवणूक निघते.

 यात्रेच्या दिवशी शनिवारी रात्री ८.४५ मिनिटांनी भागवताचार्य खुशाल महाराज (माळी) म्हाळसापिंपरी, चाळीसगाव यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कीर्तनानंतर मध्यरात्री बारा वाजता मारुतीरायाची महाआरती व महाप्रसाद वाटप होऊन यात्रा उत्सवाची सांगता होते.

Post a Comment

0 Comments