बाळू जोशी,वाकडी.ता.जामनेर.दि.२३/०८/२५
दिशा लाईव्ह न्यूज -:- राजकुंवर महाविद्यालय पिंपळा ता.सोयगांव येथे आज दि.२३ ऑगस्ट रोजी डॉ.महामानव बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन साजरा करण्यात आला, यावेळी ध्वजारोहण प्रभारी प्राचार्य राहूल राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला .
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले . ध्वजारोहनानंतर व्यखानाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यकार्माचे अध्यक्ष प्राध्यापक नरेश कोळी होते,तर प्रमुख व्याखाते दिशा लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी प्राध्यापक बि.एम.जोशी यांनी विद्यापीठ स्थापना व विद्यापीठ विषयी माहिती आपल्या मोलीक शब्दात मांडली .
तर अध्यक्ष सरांनी "आपले विद्यापीठ हे ज्ञानाचे दीपस्तंभ असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अमूल्य देणगी आहे. आपण सारे मिळून विद्यापीठाचा गौरव वाढवू, हेच आजच्या वर्धापन दिनाचे खरे यश आहे, अश्या शब्दात आपले विचार व्यक्त केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बि.एम.जोशी यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.शुभम महेर, यांनी केले . यावेळी उपस्तिथ प्राचर्य राहुल राजपूत,प्रा.नरेश कोळी,प्रा. शुभम महेर अविनाश राजपूत, विद्यार्थी व विद्यार्थिनी कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments