Type Here to Get Search Results !

पहूर येथे बारागाड्या उत्सव जल्लोषात साजरा! शेकडो वर्षांची परंपरा – पाडव्याच्या निमित्ताने ग्रामदैवत मरीआई यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद



सौ. गीता भामेरे,--प्रतिनिधी  पहूर ता. जामनेर


दिशा लाईव्ह न्यूज ---:::--- वाघूर नदीकाठी वसलेल्या पहूर नगरीत ग्रामदैवत मरीमातेच्या शतकानुशतकांच्या परंपरेतून येणाऱ्या बारागाड्या उत्सवाला यंदाही ग्रामस्थांचा व बाळगोपाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


मरीआई मंदिरापासून वेशी दरवाजापर्यंत पारंपरिक पद्धतीने गाड्या ओढण्यात आल्या. संस्थानचे अध्यक्ष श्रावण कुमावत व विश्वस्त मंडळाच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला. भगत भागवत भडांगे यांनी धार्मिक पूजन केले.


धनराज पवार, दिनकर पवार, सुभाष धनगर, युवराज पवार, अर्जुन पवार, राजाराम पवार, मधुकर पवार आदी शेतकरी बांधवांनी गाड्यांचे सहकार्य केले. दरवर्षी पोळ्याच्या करला हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो.


गावाच्या वेशी दरवाजाजवळ पाडव्याच्या निमित्ताने उभारलेल्या खाऊच्या दुकानांवर नागरिकांनी गर्दी केली. हनुमान मंदिर, महादेव मंदिर व विठ्ठल मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.


यंदा देखील मयूर करंकार, विष्णू घोंगडे, पंकज चौधरी, अश्विन पवार, सुकलाल गायकवाड, भगवान कुमावत, पवन जाधव, गणेश ढेंगाळे यांच्यासह तरुण मित्रमंडळी व ग्रामस्थांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .



Post a Comment

0 Comments