दिवाकर पाटील-नांद्रा.
दिशा लाईव्ह न्यूज ---:::--- कुंभारी गावाचे भुमिपुत्र तसेच मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे जिल्हाध्यक्ष समाजसेवक आबासाहेब पाटील यांचा वृक्ष लागवडीचा अनोखा उपक्रम आबासाहेब पाटील यापूर्वी त्यांच्या माध्यमातून विवाह वेळेवर लागावे यासाठी पाच हजाराचे बक्षीस देत होते.
तसेच कोरोना काळामध्ये त्यांनी लसीकरणाचे सुद्धा शिबीर आयोजन केले होते. त्यांनी आपल्या शेताच्या बांधावर गावातील लोकसंख्येतले वृक्ष लागवड करायची असा संकल्प केला व त्यांनी देवपिंप्री गावाचे सरपंच श्री तुकाराम निकम , मंगेश जी महाराज नाचनखेडा, दिलीप खोडपे सर राष्ट्रवादी काँग्रेस अशा मान्यवरांचे स्वागत करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात केली.
त्यांनी आपल्या बांधावर मोहगणी या वृक्षाची पाचशे पंचवीस झाडांची लागवड केली तसेच तालुक्यातील लोकांनी पण अशाच प्रकारे बांधावर वृक्ष लागवड करावी असे आवाहन केले.
कुंभारीसिम चे रमेश पाटील ,शरद पाटील ,अनिल पाटील ,युवराज पाटील, युवराज कोळी ,रविंद्र पाटील ,गोपाल पाटील, रामकृष्णा पाटील, समाधान भगत ,राहुल पाटील, संदिप पाटील ,सवखेडा येथील मा उपसरपंच मनोज पाटील, नांद्रा येथील अविनाश वाघ, भगवान पाटील, बापु पाटील,पत्रकार दिवाकर पाटील, विराट बायो प्लॅटेक प्रा ली कंपनीचे जितेंद्र सिंह, ज्ञानेश्वर माळी, गजानन हिवाळे व इतर मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments