पहूर प्रतिनिधी ,ता. जामनेर.
दिशा लाईव्ह न्यूज --::--- येथील देवळी आणि गोगडी पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या गेटमध्ये विद्युत प्रवाह सोडल्याच्या कथित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा पुजारी शिवभक्त करण्यात महाराज , विश्वस्त किशोर बनकर , ईश्वर हिवाळे यांनी निवेदनाद्वारे पहुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्याकडे केली असून या मागणीचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते यांना दिले आहे .
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर, पहूर कसबे, ता. जामनेर, जि. जळगाव हे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून नोंदणीकृत ( ई १०८६ ) ट्रस्टमार्फत चालवले जाते. सदर मंदिरात कोणतीही "आरती समिती" किंवा "आरती परिवार" नेमण्यात आलेला नाही .
दरम्यान दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी "साईमत" या दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मंदिराच्या लोखंडी प्रवेशद्वारावर अज्ञात व्यक्तींनी विजेचा प्रवाह सोडल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर, निंदनीय व समाजातील शांतता भंग करणारी असून भाविकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी आहे.
सदर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खालील प्रश्न उपस्थित होतात:
१. खरोखर मंदिराच्या गेटवर वीजप्रवाह सोडण्यात आला होता काय?
२. असल्यास, संबंधित व्यक्ती कोण होती?
३. या मागे कोणता उद्देश होता?
४. मंदिराची व ट्रस्टची प्रतिमा मलीन करण्याचा हा हेतुपुरस्सर प्रयत्न तर नव्हता ना?
५. परिसरातील भाविकांमध्ये घबराट व भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी काही समाजकंटक हे कृत्य करत आहेत का?
मंदिर परिसरात सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित असून त्याचे फुटेज तपासल्यास सत्य निष्पन्न होईल. म्हणून, आपणास विनंती आहे की, सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल.
या घटनेमुळे धार्मिक क्षेत्रात वातावरण दूषित झाले आहे.
आज जळगांव जिल्हासह महाराष्ट्रातील अनेक वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या दिशा लाईव्ह न्यूज या चॅनेलचा आज दुसरा वर्धापनदिन दिन.
गेल्या 29 वर्षाच्या प्रदीर्घ पत्रकारितेचा अनुभव आमच्या पाठीशी आहे.नेहमी सकारात्मक बातम्यांनाच आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतोय..आजपर्यंत दोन वर्षात लाखोंचे वाचक मिळणार एकमेव न्यूज चॅनेल..
असाच आपला आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या!!
विशेष--वर्धापनदिन म्हटला की जाहिरात आलीच... मात्र या दोन वर्षात आम्ही एकही जाहिरात घेतलेली नाही.
भले आमचे विचार जिथे जुळत नसतील तिथे आम्ही थांबलो आहोत..
संपादक-:- दिनेश चौधरी, लोहारा.
***********************************************
बऱ्याच वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.मात्र वेळेअभावी आम्ही काही प्रतिक्रिया प्रसारित करू शकत नाही.त्याबद्दल क्षमस्व!
पत्रकार हा केवळ माहितीचे प्रसारण न करता समाजाचा शिल्पकार असतो या विचारांचे मुर्तीमंत उदा म्हणजे भाऊसो ,दिनेश चौधरी.
भाऊंची पत्रकारिता एक प्रेरणादायी गाथा आहे. दुर्दम्य ईच्छाशक्ती असलेली माणसं परिस्थितीला एक आव्हान म्हणून स्वीकारतात.
पत्रकारितेचा मान मर्यादा जबाबदारीची पूर्ण निष्ठा बाळगून समाजाच्या विविध क्षेत्रातील माहिती ते आपल्या पर्यंत पोहचवत असतात. त्यांच्या कार्यात प्रामाणिकता सचोटी व पारदर्शकता पाहायला मिळते .
नेहमी सत्य व न्याय यांच्या पाठीशी ते असतात, कोणत्याही क्षेत्रातील बातम्या कोणतीही तडजोड न करता,न डगमगता पहायला मिळते.
हीच खरी पत्रकारितेची ताकद त्यांची आहे .आजच्या सामाजिक, राजकीय वातावरणात विरोधकाला न जुमानता बातम्यांचे प्रसारण त्यांचे असते. त्यांच्या याच तत्वांमुळे सामान्य जनता, राजकारणी व अधिकारी सहकरी यांच्या मनात विश्वासहारता निर्माण करते.
पत्रकारितेत विषयाचे सखोल ज्ञान ,जवळपास 30 वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव,अध्यात्मतेच्या जोडीला विज्ञान ,शैक्षणिक, सांस्कृतिक,शेतकऱ्यांच्या बातम्या,आणि इतरपरिस्थितीचे भान हे खूप महत्त्वाचे असतात.
हे सर्व गुण भाऊंमध्ये नस नस भरलेले आहेत .आणि म्हणून दोनच वर्षात दिशा लाईव्ह न्युज चे एवढे वाचककर्ते व व्हिजिटिरिअन पाहायला मिळतात .
अशीच उत्तरोत्तर प्रगती दिशा न्यूज लाईव्ह नेटवर्कची होत राहोआणि तुमच्या या कार्याने सामान्य जनतेला माहिती मिळत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना आणि तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
--श्री.राजेंद्र परदेशी सर,लोहारा.
मा.मुख्यध्यापक, (आदर्श शिक्षक ते मुख्यध्यापक)
डॉ.जे.जी.पंडित.मा.वि. लोहारा.
***********************************************
दिशा लाईव्ह ला हार्दिक शुभेच्छा: सत्यात पॉईंट असतो.
दिशा लाइव ला दुसऱ्या वर्धापन दिनाच्या आई प्रतिष्ठान तर्फे हार्दिक शुभेच्छा. *प्र*- म्हणजे प्रहार करणारे *त्र* -म्हणजेच तटस्थ राहून त्रस्त असणाऱ्या ची बाजू घेणे *का* - म्हणजे कानोसा घेऊन निर्विवाद सत्य शोधणे *र* -म्हणजे रयतेचे कल्याण करणे.
दिशा लाईव्ह म्हणजे निर्भीड सत्य, धर्मविरहित मांडणी करणारे, अन्यायावर प्रकाशाची ज्योत पेटविणारे, एक दिशादर्शक वादळ म्हणजे दिशा.
शुभेच्छुक :-आई प्रतिष्ठान-अरविंद भाऊ बाविस्कर, कुर्हे पानाचे.
**********************************************
दिशा लाईव्ह न्यूज लोहारा वासीयांसाठी एक अभिमानाची बाब आहे.
लोहारा येथून प्रसारित होणार हे एकमेव न्यूज चॅनेल आहे. निरपेक्ष बातम्या,आणि चुकीला चूक म्हणायची ताकद...आणि सर्व स्थरातील बातम्या आपण या चॅनेलवर नेहमी वाचतो.
अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो-आनी गावाचे नाव उजवल होत राहो.
वर्धापन दिनानिमित्त लोहारा वासीयांकडून आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
सरपंच-:- अक्षयकुमार जैस्वाल,लोहारा.
*********************************************
अत्यल्प कालावधीत वाचकांच्या जोरावर भरारी घेतलेले,प्रेक्षक वाचकांना ताज्या घडामोडिसह,अनेक वाचनीय माहिती देणाऱ्या दिशा लाईव्ह न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा*
भारत पाटील पत्रकार..--म्हसास ता.पाचोरा.
दिशा लाईव्ह न्यूजला दुसऱ्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
श्री संजय राव भास्करराव गरुड, शेंदूर्णी.
वैशालीताई सूर्यवंशी, पाचोरा.
अमोल भाऊ शिंदे-पाचोरा.
श्री यु.यु.पाटील सर--मेणगाव.
श्री विश्वासराव पाटील-लोहारा.
श्री सागरमलजी जैन-शेंदूर्णी.
ईश्वर भाऊ खरे,पत्रकार लोहारा.
डॉ. ठाकूर माहिती अधिकारी जळगांव.
अजयकुमार जैस्वाल-कुरंगी
शरद आण्णा सोनार--लोहारा
ईश्वर भाऊ देशमुख-लोहारा
अमृत भाऊ चौधरी,-लोहारा
Api कल्याणी वर्मा--पिंपळगाव हरे.
अजय चौधरी-जामनेर.
दिलीप भाऊ खोडपे-नेरी
डॉ.सागरदादा गरुड-शेंदूर्णी
लोहारा शहर व परिसर-वेबमिडिया -डिजिटल मीडिया पत्रकार.
शेख अन्सार- स्वस्थापक अध्यक्ष-द युवा ग्रामीण पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य.
श्री भामेरे सर-पहूर
श्री बाळू जोशी, वाकडी
अरून भाऊ पाटील-शेतकरी नेते-कुर्हाड
प्राध्यापक अविनाश पाटील,-लोहारा
उमेश देशमुख सर-लोहारा


Post a Comment
0 Comments