दिशा लाईव्ह न्यूज --पाचोरा प्रतिनिधी : चोरी केलेल्या मोटर सायकलची माहिती पोलिसात दिल्याच्या रागातून एका 20 वर्षीय तरुणावर चॉपरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला संशयितास अटक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाकू हल्ल्यात जखमी अनिल रवींद्र भिल (वय-२० रा.बहिरम नगर,पाचोरा) यांनी फिर्यादीनुसार श्रीकृष्ण हॉस्पीटल पाचोरा येथे अॅडमीट असतांना त्याने पाचोरा पोलिसांना जबाब दिला. बुधवारी ( 10 सप्टेंबर) सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी हा त्यांचे मित्रांसह बहिरम नगर पुलावर उभा होता.
यावेळी संशयित इरफान चिरागदिन तडवी (रा.बहिरम नगर,पाचोरा) हा त्याने चोरी केलेल्या मोटार सायकलची माहिती पोलीसात दिल्याचा राग मानत ठेवून फिर्यादीच्या मागून येत फिर्यादीच्या पाठीत त्याचे हातातील चॉपरने वारकरून फिर्यादीच्या गळ्यावर चॉपर लावून जीवे मारण्याची धमकी देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. असा जवाब दिल्यावरून आरोपी इरफान चिरागदिन तडवी विरोधात पाचोरा पोलीस स्टेशनला गुरनं. 444/2025 भा. न्याय सहीता 2023 चे कलम 109,118(1),352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी इरफान तडवी यास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ, डीबीचे रणजित पाटील, राहुल शिंपी, योगेश पाटील, शरद पाटील, श्रीराम शिंपी, गणेश कुंवर यांनी ताब्यात घेत अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ हे करीत आहेत.


Post a Comment
0 Comments