यावेळी MKCL चे मार्गदर्शक विनायक कदम, विभागीय व्यवस्थापक पुणे व उत्तर महाराष्ट्र विभाग यांनी एआय विषयी पत्रकारांसाठी उपयुक्त असे खुप छान टूलचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमधील एआय आधारित संकल्पना आणि प्रात्यक्षिके पाहून जिल्हा पत्रकार संघ यांनी हा उपक्रम नवा आणि नाविन्यपूर्ण होता असे आयोजकांचे विशेष कौतुक करुन एम.के.सी.एल. च्या कार्याचे अभिनंदनही केले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी AI प्रशिक्षण कार्यालयीन कामकाजासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरेल असे मत नोंदविले.
कॅप्शन- प्रशिक्षणात सहभागी पत्रकारांना प्रमाणपत्र देतांना ग्रामीणचे अध्यक्ष तथा पारोळा भूषणचे संपादक भिका चौधरी उपस्थित जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, विश्वस्त विजयबापू पाटील, कार्यवाहक अशोकआप्पा भाटिया, प्रा. राजेंद्र देशमुख, विवेक खडके, विनायक कदम, उमाकांत बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments