Type Here to Get Search Results !

सामाजिक बांधिलकीचे दर्शन… एक हात मदतीचा! मा. वैशालीताई सुर्यवंशी यांच्याकडून आपत्तीग्रस्तांना शिधावाटप!!



दिशा लाईव्ह न्यूज::--:- :    शिंदाड, सातगाव डोंगरी, गव्हले, पिंप्री, सार्वे, वानेगाव, निंभोरी या गावांत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी व ग्रामस्थांवर अभूतपूर्व संकट कोसळले. निसर्गाच्या रौद्ररूपाने गुरेढोरे मृत्युमुखी पडली, वाहून गेली, घरकुलं उद्ध्वस्त झाली… शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रुधारा दाटल्या, तर चेहऱ्यावर हताशपणाची सावली पसरली. अशा प्रसंगी जनतेच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या जखमी मनांवर दिलासा देणं, हेच खऱ्या अर्थाने समाजसेवेचं दर्शन आहे.याच भावनेतून समाजकारणाला सर्वोच्च ध्येय मानणाऱ्या मा. वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपत्तीग्रस्त गावांना भेट दिली. 


केवळ पाहणीवर न थांबता, गावोगावी पोहोचत त्यांनी थेट शेतकरी व कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा शिधा वाटला. गहू, तूर डाळ, साखर, तेल, मीठ, मसाले अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असलेला हा शिधा ग्रामस्थांच्या हातात देताना त्यांच्या चेहऱ्यावर आश्वासक हसू उमलले.

गावकऱ्यांशी संवाद साधताना वैशालीताई म्हणाल्या, “निसर्गाच्या कोपाने मोठं संकट आलं असलं तरी आपण सारे एकत्र आहोत. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात दिवा पेटता राहावा, कोणीही उपाशी राहू नये हाच माझा प्रयत्न आहे.”


त्यांच्या या उपक्रमामुळे गावोगावी भावनिक वातावरण निर्माण झाले. महिलांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू चमकले, तरुणाईच्या चेहऱ्यावर नवी उमेद झळकली. सामाजिक बांधिलकी जपत, संकटकाळातही आपलेपणाची उब देणाऱ्या वैशालीताईंच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.ग्रामस्थांनीही भावनिक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली , “संकटात आम्हाला सोडून न देता, मायेचा हात देणाऱ्या वैशालीताई आमच्यासाठी आशेचा किरण आहेत.”




या प्रसंगी मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, शोभाताई तेली, गोविंद शेलार, प्रदीप बोरसे, संदीप जैन, बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील, नंदू सोमवंशी, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, सिकंदर तडवी, उषाबाई पाटील, शकीलाबाई तडवी, किरण पाटील, जितू पाटील, दीपक पाटील, पवन चौधरी, समाधान पाटील, पंकज पाटील, अजित तडवी, शांतीलाल तेली, बंटी मदाडे, समाधान टाबरे, अविनाश आघाडे तसेच ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


https://youtube.com/shorts/6msD1EPuT2M?si=eq7pK7eDaoQpfwJ3


*दिशा लाईव्ह न्यूज*

ब्लू लिंकला क्लीक करून व्हिडीओ ओपन करा.

Post a Comment

0 Comments