पहूर प्रतिनिधी- ता. जामनेर :
दिशा लाईव्ह न्यूज --::-- विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच त्यांची सुरक्षा हीदेखील अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे शाळा आणि शिक्षकांनी बालकांच्या सुरक्षेबाबत जागरूक राहून सज्ज राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी केले.
सावित्रीबाई फुले विद्यालय आणि पहूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पोस्को कायद्याअंतर्गत जनजागृती शिबिरा’ प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
शिबिराचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. व्ही. घोंगडे यांनी भूषविले. प्रारंभी श्री. दाते यांचा स्नेहवस्त्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
बालरक्षक शंकर भामेरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपमुख्याध्यापिका कल्पना बनकर, ज्येष्ठ शिक्षिका माधुरी बारी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी द युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हरिभाऊ राऊत आणि आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शंकर भामेरे यांचा सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शन शिबिरात श्री. दाते यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment
0 Comments