Type Here to Get Search Results !

पहूरच्या गोगडी प्रकल्पाने गाठली शंभरी ! ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये चैतन्य!


पहूर प्रतिनिधी-:-ता. जामनेर :


 दिशा लाईव्ह न्यूज --::-- पहूरकरांची तहान भागविणारा गोगडी प्रकल्प अखेर शंभरीपर्यंत पोहोचला आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या संततधारेमुळे हा प्रकल्प शंभर टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी बांधवांमध्ये चैतन्य पसरले आहे.


अजिंठा डोंगररांगेत उगम पावलेल्या वाघूर नदीची उपनदी असलेल्या गोगडी नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे पहूर-कसबे, पहूर-पेठ, सांगवी या गावांची तहान भागते.


दरम्यान, परिसरात सतत झालेल्या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. परिणामी लघु पाटबंधारे क्षेत्रातील गोगडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.


तथापि, धरण क्षेत्रात पेरणी करणाऱ्या काही शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे जीवितहानी होऊ नये म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सुरक्षेची खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता शुभम पाटील यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments