पहूर प्रतिनिधी-:- ,ता. जामनेर
दिशा लाईव्ह न्यूज --::-- जामनेर तालुक्यातील पहूर केंद्रातील पाच शिक्षकांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध संस्थांतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत .
शिक्षण विभागातर्फे गौरव
शेरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोपाल पाटील यांनी निपुण भारत अभियानात दिलेल्या गुणवत्ता पूर्ण योगदानाबद्दल शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर यांच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .
क्रीडा क्षेत्रातील योगदान
तायक्वांदो क्रीडा प्रकारात ग्रामीण भागातील खेळाडूंना मार्गदर्शन करून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई
करत मुलांसह मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देणारे शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक सचिव तथा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक हरीभाऊ राऊत यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे .
शिक्षणातून लोकशिक्षण
शालेय अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटकांमध्ये शिक्षण जागृती, भ्रष्टाचार निर्मूलन ,अंधश्रद्धा निर्मूलन , पर्यावरण रक्षण आदी सामाजिक विषयांवर जनजागृती करणाऱ्या शंकर भामेरे यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य (अहिल्यानगर ) यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे .
शाळा स्तरावर रचनात्मक कार्य
पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर .टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका सुनिता पाटील यांनी शाळा स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कार्याच्या सन्मानार्थ पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
वाडी वस्तीवरील चिमुकल्यांसाठीच्या कार्याचा गौरव
वाडी -वस्तीवरील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल पहूर येथील गोसावी वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रकाश घोंगडे यांना शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत पहुर कसबे यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
पुरस्कारार्थी शिक्षकांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे .





Post a Comment
0 Comments