Type Here to Get Search Results !

बांबरुड राणीचे येथील डॉक्टर राम मनोहर लोहिया विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ



 शिवाजी भाऊ सुतार-:- बांबरुड राणीचे 

 दिशा लाईव्ह न्यूज --::-- सन 2024 2025 मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना येथील डॉक्टर राम मनोहर लोहिया विद्यालयात बक्षीस समारंभ कार्यक्रम आयोजन करून थोर विचार वंत साहित्यिक लेखक डॉक्टर संजय कळमकर यांच्या उपस्थितीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले

बांबरुड राणीचे येथील पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित डॉक्टर राम मनोहर लोहिया माध्यमिक उच्च माध्यमिक विद्याल यात दिनांक 30 ऑगस्ट रोजी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला यात सर्वप्रथम पाचोरा भडगाव तालुक्याचे माजी आमदार पिटीसी संस्थेचे अध्यक्ष दिलीप ओंकार वाघ चेअरमन संजय वाघ लेखक विचारवंत डॉक्टर संजय कळमकर विद्यालयाचे चेअरमन दगाजीराव वाघ आदी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय ओंकार आप्पा वाघ व सरस्वती माता प्रतिमा पूजन करून दिपप्रजलित करण्यात आले.



त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष  दिलीप वाघ विचार वंत लेखक संजय कळमकर यांचा संस्थेतर्फे शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .

तर उपस्थितांचे शब्दसुमानांनी स्वागत करण्यात आले सर्वप्रथम डॉक्टर संजय कळमकर यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक विद्यार्थी हा हुशारच असतो मठ्ठ नसतो ,प्रत्येकाला कोणतीतरी एक कला ज्ञान अवगत असते अवकाशात झेप घेणारी प्रथम महिला कल्पना चावला अशी कितीतरी उदाहरणे देत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.



 तर शिक्षण क्षेत्रात पुस्तकाशिवाय पर्याय नाही मोबाईल नव्हे मोबाईलचा वापर जेणेकरून टाळावा मोबाईल मुळे अनेक समस्या उभ्या राहिल्या असून मोबाईलच्या माध्यमातून आपली फसवेगिरी होत आहे असे ही सांगितले.

Post a Comment

0 Comments