कुऱ्हाड प्रतिनिधी -:-सुनील लोहार .
दिशा लाईव्ह न्यूज --::--कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात वर्ष 2005_06 च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले.
शुक्रवारी सकाळी आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात जणू काही या विद्यार्थ्यांची शाळाच भरलेली होती. जशी पूर्वीची शाळा भरायची त्याच पद्धतीने प्रार्थना होऊन शाळेचे माजी शिक्षक माधव घोंगडे,सुहास मोरे ,शरद महाजन,सुधाकर माळी,संदीप पाटील ,एकनाथ सुरवाडे,अविनाश पाटील,आदी शिक्षकांनी आपल्या जुन्या स्टाईल ने या माजी विद्यार्थ्यांना वर्गात बसवून अर्धा अर्धा तास शिकविले.सर्वच विद्यार्थी जुन्या आठवणीत रमले होते.
सद्या प्रत्येक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी काय करीत आहे हा देखील परिचयाचा भाग संपन्न झाला. तसेच या विद्यार्थी मेळाव्यात सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. तदनंतर शाळेतील दोन मयत वर्गमित्र अंबादास देखमुख, व गोकुळ राठोड यांच्या पत्नीस व पाल्यास या माजी विद्यार्थ्यांन तर्फे प्रत्येकी सायकल व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री एस.एम पाटील तर मुख्याध्यापक गणेश पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमास हेमंत पाटील,प्रवीण लोहार,नितीन पाटील,राजू पाटील,योगेश चव्हाण, संभाजी पाटील,प्रताप पांढरे,अविनाश चौधरी,चेतन पाटील ,राहुल शिंपी,तुकाराम चव्हाण ,मोहन तिर्मल, कडूबा देशमुख,बापू पाटील,परमेश्वर धनगर, वर्षा सुतार,शुभांगी माळी,वैशाली चौधरी,रुपाली माळी,पौर्णिमा पाटील,वंदना चौधरी,रीना पाटील व इतर सर्व 2006 चे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
नंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
.jpg)




Post a Comment
0 Comments