Type Here to Get Search Results !

पहूरच्या भावंडांची तोंडापूरच्या भगीनीस भेट गेट-टुगेदरच्या खर्चाला दिला फाटा; आर. टी. लेले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी निर्माण केला आदर्श



सौ. गीता भामेरे---पहूर (ता. जामनेर):

दिशा लाईव्ह न्यूज --::--"भेट बहीण-भावांची, भाऊबीजेची... स्नेह आणि आपुलकीची आठवण शाळेतल्या बालपणाची!"

भाऊबीज या स्नेहबंधनाच्या सणानिमित्त आर. टी. लेले हायस्कूल, पहूर येथील माजी विद्यार्थ्यांनी खरी माणुसकी दाखवित भावनिक उदाहरण घालून दिले आहे.

पहूर येथील आर .टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या

१० वीच्या मार्च १९९९ च्या बॅचमधील विद्यार्थीनी संगीता अशोक अन्नदाते (रा. तोंडापूर) यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची बातमी समजताच, तिच्या वर्गातील सर्व भावंडांनी गेट-टुगेदरचा खर्च टाळून थेट तोंडापूरला जाऊन बहिणीची भेट घेतली.

या वेळी सर्व भावंडांनी संगिताच्या लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना केली व तिला मानसिक आधार दिला.

भाऊबीजेच्या या दिवशी दाखविलेल्या स्नेहाच्या आणि आपुलकीच्या या भेटीने सर्वांचे डोळे पाणावले.

भावंडांचे हे नाते केवळ उत्सवापुरते नसून, एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देण्याचे खरे बंधन आहे, हे या प्रसंगी सर्वांनी अनुभवले.

या भावनिक भेटीत स्वप्निल छाजेड, पंकज कुसुंबीवाल, ईश्वर कुमावत, किरण पाटील, मंगेश बारी, उत्तम सोनवणे, सुनील पाटील, संतोष घोलप, दीपक आस्कर, शंकर भामेरे, आप्पा पाटील, दिलीप चांदे आदी मित्र उपस्थित होते.


यावेळी भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले संतोष घोलप यांचा मित्र परिवाराच्या वतीने स्नेहवस्र देऊन सत्कार करण्यात आला . या माजी विद्यार्थ्यांच्या संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments