दिशा लाईव्ह न्यूज -लोहारा --::-- लोहारा, ता. पाचोरा येथे दि.२०रोजी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंधरावा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तरातून गावातील कुटुंबांना घरातील ओला कचरा व सुका कचरा अलग टाकण्यासाठी दोन प्रकारच्या लिखित विनामूल्य प्लास्टिकच्या कचराकुंडी लोहारा ग्रामपंचायत तर्फे वाटप करण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी कार्यक्रम स्थळी एकच गर्दी केली होती.
या कचराकुंडी गावातील जवळपास २१०० कुटुंबीयांना वाटप होणार आहे. पहिल्याच दिवशी चारशे कुटुंबीयांनी या डसबीन घेण्याचा लाभ घेतला.
लोहारा ग्रामपंचायत तिसऱ्या दिवशी गावतील केरकचरा जमा करण्यासाठी ट्रॅकटर फिरवते, तरीही काही बेजबाबदार नागरिक मुद्दाम गल्लीत केरकचरा फेकतात. यामुळे बेजबाबदारपणे कुठेही कचरा टाकून घाण करणाऱ्यांवर नियंत्रण राहण्यासोबत गाव स्वच्छतेसाठी मदत होईल. या हेतूने या कचरा कुंडीचे वाटप करण्यात येत आहे.
यावेळी लोहारा ग्रामपंचायत आवारात विद्यमान सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे अधिपत्याखाली माजी मुख्याध्यापक अ. अ. पटेल यांच्या हस्ते वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी गावातील मान्यवरांमध्ये शिवराम भडके, माजी सरपंच अमृत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य ईश्वरभाऊ देशमुख, अशोक चौधरी, , सुरेश मोरे, अशोक क्षीरसागर, हिरालाल जाधव, भारत पाटील, गुणवंत सरोदे, बापू पाटील, संभाजी लिंगायत, दिनकर गीते, अशोक बोरसे, मनोज सोनार, सुभाष जाधव, गजानन चौधरी (दाऊद), विजय चौधरी, अनिल निकुंभ, विजय पाटील गफ्फार मिस्त्री,आदी मान्यवर हजर होते.




Post a Comment
0 Comments