प्रतिनिधी-पहूर ता जामनेर.
दिशा लाईव्ह न्यूज --::-- चक्कर येऊन पडल्याने अत्यवस्थ झालेल्या वाकोद येथील तरुणाला पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले .मात्र पुढील उपचारासाठी जळगावला हलविण्यासाठी तब्बल अर्धा तास होऊन गेल्यावरही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पहूर येथे मंगळवारी ( ता .७ ) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली .
याबाबत अधिक माहिती अशी की , सुनील साकरू जोशी रा . वाकोद हा तरुण वाकोद येथे चक्कर येऊन पडल्याने त्यास नातेवाईकांनी पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्याचे सांगितले . मात्र अर्धा तास पेक्षा अधिक वेळ होऊनही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर ग्रामीण रुग्णालयातच तरुणाने प्राण सोडले .
मयत सुनील जोशी हे वाकोद येथे राहत होते . भिक्षुकी करून आपली उपजीविका भागविणाऱ्या सुनील जोशी यांच्या पश्चात दोन मुले पत्नी आई वडील असा परिवार आहे आहे .
पहूर ग्रामीण रुग्णालयात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी संताप्त नागरिकांनी व नातेवाईकांनी केली आहे .
तर वाचले असते प्राण -
रुग्णवाहिका वेळेत आली असती तर निरपराध तरुणाचे प्राण वाचले असते असे सांगून मयताचे नातेवाईक सुशिल जोशी , गोविंदा जोशी, कृष्णा जोशी गोरगरिबांचे कोणी आहे का वाली ? असा संतप्त सवाल केला आहे .


Post a Comment
0 Comments