दिशा लाईव्ह न्यूज। --::-- अर्जुनभोई हे महर्षी वाल्मिकी राष्ट्रीय उत्कर्ष प्रकाशन आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाच्या उपक्रमातून सन्मानित होतांना लोहारा नगरीच्या शिरपेचात पुन्हा एकदा नविन भर पडत आहे.
जेष्ठ समाज सेवक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात ३० वर्षापासून कार्यरत असलेले श्री अर्जुनभोई लोहारेकर सद्यस्थितीत मुंबई विभागात कार्यरत आहेत.
महर्षी वाल्मिकी पुरस्काराने सन्मानित होतांना त्यांच्या वर अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
डॉ अरविंद गुप्ता फाऊंडर, सीईओ तसेच मिसेस एलिना मेहरा को. फाऊंडर, महर्षी वाल्मिकी राष्ट्रीय उत्कर्ष प्रकाशन तसेच भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने वाल्मिकी जयंतीच्या वेळी अर्जुनभोई यांना सर्टीफाईट करण्यात आले.
त्यांनी विविध ठिकाणी दिलेल्या विविध क्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आल्याचे समजत आहे.
लोहारा ,ता.पाचोरा परिसरात तर विविध समुदायाकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. आज पर्यंत त्यांना अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments