Type Here to Get Search Results !

बुद्ध धम्माचे विचार समतेवर आधारित- रविंद्र खरात पहूर येथे बौद्ध प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ उत्साहात धम्म रॅलीने वेधले लक्ष



दिशा लाईव्ह न्यूज --::--- पहूर (ता. जामनेर) – बुद्ध धम्माचे विचार समतेवर आधारित असून घराघरापर्यंत धम्माचे विचार पोहोचवा असे आवाहन रवींद्र खरात यांनी केले . पहूर येथे सुरू असलेल्या धम्म प्रवचन मालिकेचा सांगता समारंभात ते बोलत होते .

       आज मंगळवारी  ( ता . ७ ) कार्यक्रमाची सुरुवात बुध्दविहारात बौद्ध भिक्खू यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहणाने झाली. प्रारंभी भन्तेजींनी सर्व उपासकांना पंचशील प्रदान केले. त्यानंतर सवाद्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले . यामध्ये जामनेर तालुक्यातील असंख्य बौद्ध उपासक सहभागी झाले होते.


यानंतर डॉ . बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक येथील समाजरक्षक अर्जुन नाना पगारे व पाळधीचे  सरपंच ॲड. प्रशांत बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विविध मान्यवरांनी बुद्ध धम्म व सामाजिक समतेविषयी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामनेर तालुका बौद्ध महासभेचे अध्यक्ष चंद्रकांत इंगळे होते. जिल्हाध्यक्ष रवींद्र खरात यांनी आपल्या भाषणात “बुद्ध धम्माचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा” असे आवाहन केले. तर जिल्हा सरचिटणीस  सुशिलकुमार हिवाळे यांनी समता सैनिक दलाची आचारसंहिता स्पष्ट करून महिलांनी धम्म शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. वसंतदादा यांनी अंधश्रद्धामुक्त आणि विवेकी समाज निर्मितीसाठी भारतीय बौद्ध महासभा सदैव तत्पर असल्याचे सांगितले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्यान यांनी केले, तर आभार  निवृत्त केंद्रप्रमुख दिनकर सुरडकर यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी  माजी उपसरपंच रवि मोरे, किरण खैरणार, निवृत्त मुख्याध्यापक विलास भालेराव, प्रमोद सुरवाडे,  लहानू दाभाडे, नरेश मोरे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. जामनेर रस्त्यावरील बुद्ध विहारापासून निघालेल्या धम्म रॅलीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते .



Post a Comment

0 Comments