दिशा लाईव्ह न्यूज -:- पहूर ता जामनेर (दि . २६ )
बदलत्या काळानुसार शिक्षकांनी स्वतःच्या ज्ञानात भर घालून बदल स्वीकारावा , अन्यथा व्यवस्था तुम्हाला प्रवाहाच्या बाहेर टाकेल असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ . अनिल झोपे यांनी केले .
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ए .टी . झांबरे विद्यालयात आयोजित सेवांतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतन श्रेणी शिक्षक प्रशिक्षणात ते बोलत होते .
यावेळी डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ . चंद्रकांत साळुंखे , प्रशिक्षण समन्वयक डॉ . शिवाजी ठाकूर , विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे मंचावर उपस्थित होत्या .
प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुलभक डॉ . अतुल इंगळे यांनी केले . प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी आभार मानले .
याप्रसंगी बालभारतीचे अभ्यास मंडळ सदस्य डॉ .जगदीश पाटील यांनी ' शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा ' (SQAAF ) विषयावर सखोल मार्गदर्शन केले .
जिल्हाभरातून सुमारे १०९ शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत . सदर १० दिवसीय प्रशिक्षणास काल २५ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली असून ३ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे .
काय आहेत वैशिष्ट्ये ?
प्रत्येक तासिकेला ऑनलाईन हजेरी .
५० गुणांचे प्रशिक्षणा दरम्यान पाच समुह स्वाध्याय .
५० गुणांचे प्रशिक्षणोत्तर पाच वैयक्तिक स्वाध्याय.
५० गुणांची लेखी परीक्षा .
५० गुणांचे कृती संशोधन / प्रकल्प / नवोपक्रम
प्रशिक्षणाचा गाभा -
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार शिक्षणाक्षेत्रात होत बदलांचा शिक्षकांना परिचय व्हावा .
विद्यार्थी हा केंद्रबिंदू .
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन स्वतःसह पालकांकडूनही होणार .
केवळ शैक्षणिक बुद्धिमत्तेला महत्त्व न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला चालना


Post a Comment
0 Comments