Type Here to Get Search Results !

पहुर शिवारात जोरदार पावसामुळे केळीचे नुकसान भाव मिळेना... त्यातच अस्मानी संकट! शेतकरी चिंताग्रस्त!-




पहूर  प्रतिनिधी  (ता. जामनेर)

 दिशा लाईव्ह न्यूज --::---पहूर परिसरात काल (रविवार) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतशिवारात मका, कपाशी तसेच केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मोसंबी फळबागाही बाधित झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.


शेतकरी हेमंत अरविंद बनकर यांची सुमारे पाचशे ते सातशे केळीची झाडे वारा व पाण्यामुळे जमीनदोस्त झाली आहेत.



तर शेतकरी महेंद्र भागवत बनकर यांच्या मोसंबी बागेलाही मोठा फटका बसला असून सुमारे २० ते २५ टनांपर्यंतचे नुकसान झाल्याचे समजते.




पावसाने दिलासा देण्याऐवजी आता चिंता वाढवली आहे. आधीच शेतीमालाला भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते, त्यातच या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे.

सरकारने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments