Type Here to Get Search Results !

पळासखेड मिराचे येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न


दिशा लाईव्ह न्यूज --::--- जामनेर तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथे दि.24/10/2025 रोजी 27 वर्ष जुनी मैत्री उजळून काढण्यासाठी निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आले होता. 

सदर स्नेह मेळाव्याची आर्थिक खर्चाची व इतर नियोजनाची जबाबदारी माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी ग्रुप चालक किरण हडप यांनी पार पाडली.

तब्बल 27 वर्षांनी सर्व मित्र परिवार एकत्र आला.

या संमेलनात अनेक विविध उपक्रम राबवण्यात आले.सर्व प्रथम प्रत्येक सदस्यास आपल्या परिवारासोबत येण्यास आग्रह करण्यात आला आणि महत्वाचे म्हणजे सदर बॅच च्या वतीने आठवण म्हणून एक वडाचे वृक्ष लावण्यात आले.

रुपये 21000/ चा धनादेश विद्यालयास किरण हडप यांच्या तर्फे 1998 बॅच च्या वतीने प्रदान करण्यात आला.प्रत्येक सदस्यास एक भगवद गीता सप्रेम भेट देण्यात आली.सर्व ग्रुप सदस्यांना एक  पारंपरिक टोपी प्रदान करण्यात आली त्यावर ' आम्ही 1998 वाले ' असे लिहिण्यात आले त्यामुळे कार्यक्रम अतिशय सुंदर व शिस्तबद्ध दिसला.बऱ्याच सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आयोजक किरण भाऊ हडप यांचे आभार मानले आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या. अनेकांना जुन्या आठवणी व्यक्त करताना डोळ्यातून अश्रु थांबवता आले नाहीत.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे  मुख्याद्यापक व्हि.आर. पाटील सर यांनी भूषवले, त्याचे स्वागत आयोजक किरण हडप आणि महिला सदस्या तर्फे आरती पवार यांनी केले.सोबत पर्यवेक्षक जी.आर.पाटील सर, वरिष्ठ महिला शिक्षिका भामरे मॅडम देखील उपस्थित होत्या.सोबत इंगळे सरांनी खूप सुंदर असे सूत्रसंचलन केले.



कार्यक्रमाला अजून रंगत आणण्यासाठी खान्देशी सासूबाई रील स्टार गौरी मानभास यांना आयोजका तर्फे आमंत्रित केले होते त्यांच्यामुळे कार्यक्रम खूप मनोरंजक आणि उत्साहात पार पडला.कार्यक्रम सुरू असताना काही वरिष्ठ विद्यार्थ्यांचे सुद्धा आगमन झाले असता आयोजकांनी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी खान्देशभूषण पुरस्कार प्राप्त बापूसाहेब सुमित पाटील,डॉ. नितीन हडप,तुकाराम हिवाळे, गणेश पवार, भारत वराडे, संजय वराडे, गोपाल हडप, माणिक शिंदे, बापू शिंदे, अनिल हडप किशोर सोनार, आरती पवार, मनिषा पाटील, सुवर्ण आगळे, पद्माकर पाटील, सविता मराठे, निलेश सोनवणे, विजय  हडप, कविता हडप, रवींद्र बिऱ्हाडे, प्रवीण पवार, प्रमोद पवार, आणि आयोजक किरण हडप व प्रियांका हडप यांनी मेहनत घेतली.प्रास्ताविक विजय हडप आणि आभार प्रदर्शन किरण हडप यांनी केले.



Post a Comment

0 Comments